महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेनची धूम स्टाईलने चोरी
By सदानंद नाईक | Updated: May 6, 2024 16:38 IST2024-05-06T16:38:31+5:302024-05-06T16:38:48+5:30
याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेनची धूम स्टाईलने चोरी
उल्हासनगर : स्पोर्ट्स मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन खेचून चोरी केल्याची घटना द्वारलीगाव बस स्टॉप जवळ रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगाव बस स्टॉपजवळ रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता मुलाची वाट पाहत रिक्षात बसलेल्या बहिणी सोबत रेखा बाळाराम ठोंबरे या बोलत उभ्या होत्या. त्यावेळी स्पोर्ट्स मोटरसायकलवरून धूम स्टाईलने आलेल्या दोन इसमानी रेखा ठोंबरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चेन खेचुन पळ काढला. मंगळसूत्र व चेन खेचुन पळ काढत्या वेळी रेखा ठाकूर यांच्या गळ्याला जखम झाली असून मंगळसूत्र व चेनची किंमत ३ लाख ३० हजार होती. या चोरी प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.