वडिलांनीच केली मुलाची हत्या, सुनेने बनविलेल्या जेवणावरून झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:03 IST2018-05-22T09:03:17+5:302018-05-22T09:03:17+5:30

वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. 

Man killed by father over his wife’s cooking | वडिलांनीच केली मुलाची हत्या, सुनेने बनविलेल्या जेवणावरून झाला वाद

वडिलांनीच केली मुलाची हत्या, सुनेने बनविलेल्या जेवणावरून झाला वाद

उल्हासनगर- वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.  या प्रकरणी हत्या झालेल्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. रविवारी ही घटना घडली. कृष्णा (वय 24) असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव असून तो त्याची पत्नी  रेखा (वय 19) आणि वडील शांताराम उजैनकर यांच्याबरोबर विठ्ठलवाडीतील शास्त्रीनगरमध्ये राहत होता.  

रविवारी (ता. 20 मे) रेखाने जेवण बनवलं होतं. व शांतारामला जेवायला वाढलं. त्यावेळी कृष्णा ऑफिसला गेला होता. रेखाने बनवलेलं जेवण शांतारामला आवडलं नाही म्हणून त्याने ते गटारीत फेकलं. त्यामुळे रेखा नाराज झाली. कृष्णा घरी आल्यावर शांतारामने सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर कृष्णानेही रेखाला शिवीगाळ केली. 

रात्री जेवल्यानंतर कृष्णा बाहेर फिरायला गेला असताना शांतारामने पुन्ही रेखाबरोबर वाद घालायला सुरूवात केली आणि तिला मारहाणा केली. वडिलांचा हा संपूर्ण प्रकार कृष्णाने पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेखाला त्रास देऊ नका असं कृष्णाने वडिलांना सांगितल्यावर त्याने कृष्णालाही मारहाण केली, या मारहाणीत कृष्णाचा जागेवरच मृत्यू झाला. 
 

Web Title: Man killed by father over his wife’s cooking