भिवंडीत यंत्रमाग कामगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:45 IST2020-04-18T21:42:01+5:302020-04-18T21:45:49+5:30

या हत्येप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.

Man killed in bhiwandi | भिवंडीत यंत्रमाग कामगाराची हत्या

भिवंडीत यंत्रमाग कामगाराची हत्या

भिवंडी ( दि. 18 ) शहरा लगतच्या कारीवली येथील तलावाच्यापुढे एका यंत्रमाग कारखान्यात मेहता म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी घडली आहे. अजित स्वयंकांत पटेल (47 रा.बालाजी नगर ,कारीवली ) असे भोसकून हत्या झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कामगार भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो सकाळी कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी तो तलावाच्या पुढे असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याने ते थेट हृदयात वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या हत्येप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ( गुन्हे )  नरेश पवार हे करीत आहेत.

 

Web Title: Man killed in bhiwandi