लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बसमधील प्रवाशी महिलेचा मोबाईल चोरुन पलायन करणाºया पाच जणांच्या टोळीतील मजाज सय्यद (४६, रा. मुंब्रा) याला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. त्याच्याकडून हा चोरीतील २० हजारांचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सुस्मिता विंदेश्वरी सिंह (२६) ही महिला ठाण्यातील मानपाडा येथून मीरा रोड येथील आपल्या घराकडे २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमधून प्रवास करीत होती. त्याचवेळी घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाकाजवळ आल्यानंतर तिच्या पॅन्टमधील मोबाईल कोणीतरी लांबविल्याचे तिच्या लक्षात आले. वाघबीळ नाका येथे उतरताच तिने ही माहिती तिथे वाहनांची तपासणी करणाºया सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांना दिली. याच माहितीच्या आधाारे पालवे यांच्या पथकाने तिथून घाईघाईने जाणाºया अन्य एका प्रवाशाला तात्काळ पाठलाग करुन पकडले. त्याच्या अंगझडतीतून त्याच्या पँटच्या खिशातील मोबाईल पोलिसांनी जप्त केला. हा आपलाच मोबाईल असल्याचे सुस्मिता यांनी ओळखले. त्याने आपली ओळख मजाज सय्यद अशी सांगितली. त्याच्यासह चार ते पाच जणांची टोळी रोज मुंबई ठाणे परिसरात अशाच प्रकारे मोबाईलची चोरी करीत असल्याची कबूलीही त्याने चौकशीमध्ये पोलिसांना दिली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पालवे यांच्या पथकातील पोलीस नाईक रमेश जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
बसमधील प्रवाशी महिलेचा मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 20:56 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बसमधील प्रवाशी महिलेचा मोबाईल चोरुन पलायन करणाºया पाच जणांच्या टोळीतील मजाज सय्यद (४६, रा. ...
बसमधील प्रवाशी महिलेचा मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे मुंबई ठाण्यात मोबाईलची चोरी करणारी टोळी कासारवडवली पोलिसांची कामगिरी