ठाणे जेलमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:06 IST2017-07-29T13:06:39+5:302017-07-29T13:06:47+5:30

वसईतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीने ठाणे जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Man arrested on rape charges last year allegedly hangs himself in Thane jail | ठाणे जेलमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या 

ठाणे जेलमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या 

वसई, दि. 29 - अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीने ठाणे जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आशिष अनुप बरणवाल असे आत्महत्या केलेल्या आरोपीचं नावे असून शुक्रवारी (28 जुलै ) मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी आशिष बरणवाला वसईतील कामण डोंगरपाडा येथील रहिवासी होता.  सामूहिक बलात्कार आणि पोस्को अंतर्गत आशिषसह सहा जणांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या वर्षभरापासून आशिष ठाणे जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 


14 जुलै 2016 रोजी वालीव परिसरातील एका अल्पवयीन मुलीला आशिषसह सहा जणांनी जबरदस्तीने गणेशपुरी येथील लॉजमध्ये तवेरा गाडीतून नेले होते. तिथे तिला बिअर पाजून तिच्यावर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सहाही आरोपी अटकेत असून अडीच महिन्यात या गुन्ह्यातील चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली. यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.
 


Web Title: Man arrested on rape charges last year allegedly hangs himself in Thane jail