अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:17 PM2021-11-21T16:17:12+5:302021-11-21T16:19:32+5:30

कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुरेश उर्फ सूर्यकांत महाजन (४७, रा. कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

Man arrested for molesting minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कामगिरीआरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुरेश उर्फ सूर्यकांत महाजन (४७, रा. कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोपरीतील गांधीनगर भागात राहणाºया सुरेश याने त्याच भागातील या पिडित मुलीला ती घरातील जिन्यावर एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा विनयभंग केल्याची घटना ७ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. याबाबत पिडित मुलीने आपल्या कुटूंबीयांना याची माहिती दिल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्यांनी याप्रकरणी सुरेश याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा आणि दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी यांच्या पथकाने सुरेशला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

Web Title: Man arrested for molesting minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.