ठाणे जिल्ह्यात हिवतापासह जेई - डेग्यूने महिन्याभरात नऊ जणांचा मृत्यू

By सुरेश लोखंडे | Updated: September 25, 2018 20:08 IST2018-09-25T19:59:25+5:302018-09-25T20:08:12+5:30

हवामानात बदल होऊन उष्णतेचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले. यामुळे साथीच्या आजारांच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. सर्दी, खोकला, थंडीताप, डोकेदुखी आदीं साथीसह काही ठिकाणी काविळीचे रूग्णही आढळून आले आहेत. याशिवाय डेंग्यू या जीवघेण्या आजाराबरोबर आता जापनेसे हा मच्छरापासून उद्भवणारा आजारही उघडकीस आला आहे.

Maleriya - Japanese encephalitis-Daegu death toll in Thane district | ठाणे जिल्ह्यात हिवतापासह जेई - डेग्यूने महिन्याभरात नऊ जणांचा मृत्यू

महिन्याभरात तापासह डेंग्यूचे संशयीत चार रूग्णांसह एकूण नऊ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देहवामानातील बदल* साथीच्या आजारांमध्ये वाढया साथीच्या आजारांच्या चक्र व्युहात जिल्ह्याभरात ७४ जणांचा समावेश

ठाणे : जिल्ह्यात ठिकठिकाणी हिवतापासह इतर तापांचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. याशिवाय डेंग्यूची लागण झालेलेही आढळून येत आहेत. महिन्याभरात तापासह डेंग्यूचे संशयीत चार रूग्णांसह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. यात ठाण्यात ही रविवारी डेंग्यूमुळे दगावलेल्या एका तरुणीचा तसेच उल्हासनगरात जेईच्या तापाने गेलेल्या रुग्णाचा समावेश आहे. जेई या नव्या तापाची यंदा भर पडल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा हैराण झाली आहे.
जिल्ह्यात पावसाने सुमारे महिन्यापासून दडी मारली आहे. यामुळे हवामानात बदल होऊन उष्णतेचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले. यामुळे साथीच्या आजारांच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. सर्दी, खोकला, थंडीताप, डोकेदुखी आदीं साथीसह काही ठिकाणी काविळीचे रूग्णही आढळून आले आहेत. याशिवाय डेंग्यू या जीवघेण्या आजाराबरोबर आता जापनेसे हा मच्छरापासून उद्भवणारा आजारही उघडकीस आला आहे. या आजाराचे उल्हासनगर महापालिकेच्या कुर्ला कॅम्प येथे दोन रुग्णांसह सीव्हीलमध्ये तीन रूग्ण तर अंबनाथ नगरपालिकेच्या ताडवाडी परिसरात १७ संशयीत रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्याभरात एकूण आठ जणांचा साथीच्या विविध आजारांनी दगावले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात एक जण हिवतापाने दगावल्याची नोंद आहे. तर डेंग्यूच्या तापामुळे महापालिका क्षेत्रात सुमारे चार रूग्ण दगावले आहेत. नगरपालिका क्षेत्रात एका रूग्णाचे निधन झाले. इतर ताप म्हणून दोन रूग्ण दगावल्याची नोंद झाली. तर नव्याने मच्छरापासून होणाऱ्या जेईच्या तापासून उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मृत्यू झालेल्या या रूग्णांच्या कालावधीत हिवतापाचे १६ रूग्ण आढळून आलेले आहेत.
* डेंग्यूसह जेईच्या रुग्णात वाढ
डेंग्यूच्या तापाचे ३० रूग्ण, इतर तापांची ११ रूग्ण तर जेईच्यातापाचे १७ रूग्ण आदी या साथीच्या आजारांच्या चक्र व्युहात जिल्ह्याभरात ७४ जणांचा समावेश आढळून आला. सध्याच्या उष्ण व दमट हवामानामुळे साथीचे आजार बळावत असून रूगणालयांसह दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. याकडे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष केंद्रीत करून उपाययोजनां तत्पर करण्याची चर्चा रूग्णालय आवारात ऐकायला मिळत आहे.

Web Title: Maleriya - Japanese encephalitis-Daegu death toll in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.