शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:36 AM

ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत

ठाणे - शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात शुक्रवारी आयोजित ठाणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अव्वर सचिव एस.व्ही.आर.रमण्णा, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे सीईओ तथा ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक मिलिंद पाटणकर, पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी, क्रि सिल कंपनीच्या सचिव कल्याणी ओक तसेच महापालिकेचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. यावेळी ठाणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आधारित संपूर्ण शहरातील उपक्र म (पॅन सिटी) तसेच परिसर आधारित विकास (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) या दोन विभागांतील प्रकल्पांच्या संकल्पना-डिझाइनसंबंधित अभियंत्यांकड़ून चर्चा तसेच अभिप्रायासाठी सादर करण्यात आल्या. स्मार्ट सिटीअंतर्गत सामूहिक विकास योजनेसाठी विशेष फोरमच्या मदतीने नागरिकांच्या शंकांचे निरसन करून प्रसंगी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.ॉबसच्या येण्याजाण्याची वेळ कळणारपॅन सिटीअंतर्गत येणाºया इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम या उपक्र मांतर्गत शहरातील विविध बसस्थानकांवर बसची येण्याजाण्याची निर्धारित वेळ प्रवाशांना समजेल, अशी रचना करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत सॅटीस येथे ही सुविधा सुरू केली आहे. लवकरच शहरातील सगळ्याच बसस्थानकांवर ती सुरू होणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. शहरात इन्टेक वायफाय सुविधा ठाणे महानगरपालिकेकड़ून देण्यात येते.शहरातील ३८० ठिकाणी ८०० केबीपीएस स्पीडने ही वायफाय सुविधा कार्यान्वित असून याहीपेक्षा अधिक जलद वायफाय सुविधा येत्या दोन आठवड्यांत सुरू करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत जवळपास दोन लाखांहून अधिक वापरकर्ते या सुविधेचा लाभ घेत आहेत. शहरात ७८ सीसीटीव्ही कॅमेरे असून ४०० कॅमेरे बसवण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. हे सर्व कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाnewsबातम्या