Makar Sankranti 2018 : बच्चे कंपनीने लुटला पतंग महोत्सवाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:43 IST2018-01-13T14:43:45+5:302018-01-13T14:43:45+5:30

Makar Sankranti 2018 : बच्चे कंपनीने लुटला पतंग महोत्सवाचा आनंद
डोंबिवली- वेगवेगळ्या डिझाईनचे, आकाराचे आणि रंगाचे पतंग आकाशात उंच उंच उडताना पाहून बच्चे कंपनीने आनंद लुटला. निमित्त होते ते मेरा बचपन किंडर गार्डन्स या स्कूलच्या विद्याथ्र्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे.
भागशाळा मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतर्फे प्रथमच अश्या महोत्सवाचे आयोजन केले होते. ‘प्ले ग्रुप’पासून ‘सिनियर केजी’ च्या मुलांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. एकूण 56 विद्याथ्र्यानी पतंग उडविण्याची मजा लुटली. लहान मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण दिले जाऊ नये, तर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. पतंग महोत्सवासोबतच तिळगूळ समारंभ ही यावेळी पार पडला. मुलांना पतंग उडविण्यासाठी त्यांच्या पालकांनी मदत केली. पतंग महोत्सवातून आज लहानग्याना ही पतंग उडविण्याची मजा लुटता आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरूण हेडाऊ, संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर खटी, शाहू भोसले, कमलाकर जकातदार, वैद्यनाथ मिश्र, शाळेचे चेअरमन गणोश भोईर, मुख्याध्यापिका प्रतिभा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
अरूण हेडाऊ म्हणाले, जानेवारी महिन्यातील मकरसंक्रात हा पहिला सण आहे. या सणाच्या निमित्ताने स्नेह वृध्दींगत व्हावा आणि तिळगूळाचा गोडवा कायम राहावा. पतंग उडविणो हा खेळ एक मनोरंजनाचा भाग आहे. त्यासाठी पतंग नक्की उडावा. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या व वाईट बाजू असतात. पतंग उडविल्यामुळे पक्ष्यांना इजा होते. परंतु विमानाची ही पक्ष्यांना धडक लागून अपघात होत असतात म्हणून काय विमानसेवा बंद होत नाही. पतंग महोत्सव साजरा करताना पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सणाचा ही आनंद लुटावा असे त्यांनी सांगितले.
पतंग चीनमधून भारतात आली.
अमेरिकेत रेशमी कापड आणि प्लॉस्टिकपासून बनवलेले पतंग उडविले जातात. भारतात ही पतंग उडविण्याची आवड हजारो वर्ष जुनी आहे. चीनच्या बौध्द तीर्थयात्रिका यांच्या माध्यमातून पतंग उडविण्याचा खेळ भारतात पोहोचला. मुगल बादशहाच्या काळापासून पतंग मोठय़ा आवडीने उडविला जातो. गुजरातमध्ये दरवर्षी 14 जानेवारीला पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात देखील मकारसंक्रातीला पतंग उडवून या खेळाचा आनंद लुटला जातो. लहानपासून मोठय़ार्पयत सर्वानाचा पतंग उडविण्याचा मोह आवरता येत नाही.