ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:30 IST2025-04-26T13:29:51+5:302025-04-26T13:30:04+5:30
आज सकाळपासूनच घोडबंदर रोडवरील आर मॉलपासून गायमुख घाटाच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: पावसाळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे पुन्हा ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिशन गायमुख घाट सुरू केले गेले आहे. येथील दुरुस्तीसाठी सलग १०० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. याकरिता घोडबंदर मार्ग जड-अवजड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला असे सांगितले आहे.
नाशिक, मुंबई, जेएनपीए आणि गुजरातकडून येणारी-जाणारी वाहतूक अंजूर फाटा, माणकोली मार्गांवरून वळवल्याने या मार्गांना चोहोबाजूंनी येणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा ताण सहन करावा लागणार आहे. आज सकाळपासूनच घोडबंदर रोडवरील आर मॉलपासून गायमुख घाटाच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे.