शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
3
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
4
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
5
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
6
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
7
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
8
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
9
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
10
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
11
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
12
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
13
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
14
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
15
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
16
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
17
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
18
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
19
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
20
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
Daily Top 2Weekly Top 5

Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:43 IST

Ambernath Shivsena-BJP Clash Video: अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाहेर आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपालिकेबाहेर झालेल्या या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Ambernath Shivsena-BJP Rada: अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नगरपालिकेबाहेर जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला असताना, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र समीकरणे बदलली. या निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकत्र येत बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या पराभवामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि संघर्षाची ठिणगी पडली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये थेट लढत झाली. भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीला २८ मते मिळाली. तर, अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडीला (शिंदेसेना + राष्ट्रवादी: अजित पवार) ३२ मते मिळाली.

दरम्यान, सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड होताच पालिकेबाहेर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सदा मामा पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्याने शिंदेसेनेचे कार्यकर्ते संतापले. पाहता पाहता या घोषणाबाजीचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. नगरपरिषदेच्या गेटबाहेरच कार्यकर्त्यांनी एकमेकांशी वाद घालायला सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.

महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर

अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचा असताना उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिंदेसेनेने भाजपला धक्का दिला आहे. यामुळे शहरातील भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. या राड्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts in Ambernath: BJP, Shinde Sena Workers Fight Over Election!

Web Summary : Post-election in Ambernath, BJP and Shinde Sena workers clashed outside the municipality. Tensions rose after the Shinde group and Ajit Pawar faction won the deputy mayor election, defeating the BJP candidate. The conflict highlights rifts within the ruling coalition.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाThane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणambernathअंबरनाथ