महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर; राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयाची माहिती
By अजित मांडके | Updated: February 3, 2024 13:42 IST2024-02-03T13:42:15+5:302024-02-03T13:42:36+5:30
ज्युपिटर हॉस्पिटलची पत्रकाद्वारे माहिती

महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर; राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयाची माहिती
ठाणे: शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर रात्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर, त्यांना अतिदक्षता विभागात आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे ज्युपिटर हॉस्पिटलने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात त्यांच्यावर अतिदक्षता तज्ज्ञ, जनरल सर्जन, थोरॅसिक आणि ऑर्थोपेडिक सर्जन यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची तज्ज्ञ टीम बारकाईने लक्ष ठेवून आहे. असेही म्हटले आहे. तर त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्यावर ही रात्रीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अशी माहिती पत्रकात म्हटले आहे.