शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी; काँग्रेसनं सोडला सेना अन् राष्ट्रवादीवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 14:37 IST

एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बैठकीला बोलवा, अशी मागणी करीत नाराजी व्यक्त केली.

ठाणे  : मागील काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज होत असल्याचे चित्र आहे. तीच नाराजी आता ठाण्यातही उघडपणे  समोर येऊ लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बैठकीला बोलवा, अशी मागणी करीत नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे कॉंग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो, असा सवाल उपस्थित केला आहे. कोविड रुग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टिकोनातून बैठकी होतात, त्यावेळेसही आम्हाला डावलले जाते, असा धक्कादायक आरोपही कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कॉंग्रेसची नाराजी असून प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याने वारंवार महाविकास आघाडीत ठिणगी पडत आहे.ती ठिणगी आता ठाण्यातही पडू लागली आहे. राज्यात तर आम्हाला डावलले जातेच, परंतु ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करीत थेट आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आक्षेप घेतला आहे, परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आम्हाला डावलत असल्याने आम्ही कधी नाराजी व्यक्त केली का? उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त करीत होतो. परंतु आता आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही.ज्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करीत होते, तेव्हाही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का?, कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ, शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारात घेतले नाही. आम्हीदेखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हालादेखील शहराची आणि येथील नागरिकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. आता बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहोचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस