शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 01:22 IST

ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

ठाणे : ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नसतील तर ओवळा -माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघातही भाजपचे पदाधिकारी हे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचाराच्या मुद्यावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी काही मतदार संघात वाद सुरू आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा निष्ठावान शिवसैनिकांनी हट्ट धरला होता. मात्र, आता भाजपचे उमेदवार म्हणून संजय केळकर यांच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा असहकार कितपत टिकणार हे आता समजू शकलेले नाही. असे असले तरी केळकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले असून त्यांची एक गुप्त बैठक ठाण्यात पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार केळकर यांच्या विरोधात सर्वपक्षीयांच्या वतीने एक उमेदवार दिला जाणार असून तोच ३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरेल असेही बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेचे वरिष्ठ मंडळी यावर तोडगा काढणार असल्याचेही सांगितले जात आहे.भाजपचे प्रत्युत्तरशिवसैनिकांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात असहकार पुकारल्याने त्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज झाली आहे. शिवसेनेने केळकर यांचा प्रचार न केल्याने आता भाजपनेही ओवळा माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार करणार नसल्याचे धोरण अवंलबले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा