शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Vidhan Sabha 2019: विधानसभा निवडणूक ठरणार मनसेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 00:03 IST

२४ मतदारसंघांतील समस्यांचा अभ्यास सुरू; ठाणे-पालघरमध्ये राज ठाकरेंच्या सभा

- अजित मांडके ठाणे : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यात १०० ठिकाणी मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यातील २४ उमेदवार हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील असणार आहेत. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानिमित्ताने का होईना जोश निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघरमध्ये सभा होणार आहेत. यामध्ये ते भाजपविरोधात पुन्हा डरकाळी फोडणार आहेत. याशिवाय, विधानसभेच्या या कठीण परीक्षेत किती टक्के मिळणार, याचाही अभ्यास मनसे यानिमित्ताने करणार आहे.लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता केवळ लाव रे तो व्हिडीओमुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु, अखेरच्या क्षणी मनसेने १०० जागा लढविण्याचे जाहीर केले. ठाणे आणि पालघरमधील सर्वच जागांवर म्हणजेच २४ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. त्यासाठी प्रचाराचाही अजेंडा जवळजवळ निश्चित झाला आहे. यामध्ये रस्ते, वीज, पाणी आदींसह मूलभूत सोयीसुविधांची वानवा याची पोलखोल केली जाणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघांतूनही अशाच प्रकारे प्रचार केला जाणार असून मनसे सत्तेत आल्यास विकासाची हमीही दिली जाणार आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर आदी भागांत राज ठाकरे यांची डरकाळी फुटणार असून मोदींची पोलखोल हा कार्यक्रम यानिमित्ताने प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेला मानणारा किंबहुना मराठी मतांचा टक्का किती मनसेला साथ देणार, याचाही अभ्यास या निवडणुकीत होणार आहे.लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसेला कुठे, किती मते मिळू शकतात, मनसेच्या मतांचा फटका कोणाला बसणार, हे चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत या सर्वांचीच उत्तरे किंबहुना किती टक्के मते मिळणार, हे स्वत: मनसे आणि इतर पक्षांना समजणार आहे. याच निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या जोरावर मनसेचा महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.पालघर नगर परिषदेत मनसेचा उमेदवारच नाहीठाणे जिल्ह्यापेक्षाही पालघर जिल्ह्यात मनसेची स्थिती अवघड आहे. मागील काही वर्षांत मनसेचा या पट्ट्यात तसा कुठेच प्रभाव दिसून आलेला नाही. पालघर नगर परिषदेत तर मनसेला उमेदवारसुद्धा मिळाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, येथेही मनसेचे इंजीन थांबलेलेच म्हणजे त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. मागील दीड वर्षापूर्वी मात्र जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर काही आंदोलनाच्या माध्यमातून मनसे येथे आहे, हे थोड्या अंशी चित्रित झाले. एकूणच ठाण्यापेक्षाही पालघरची परीक्षा मनसेसाठी अतिशय अवघड ठरणार असून त्यांना गुणांची टक्केवारी मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे