सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा
By अजित मांडके | Updated: November 17, 2022 20:52 IST2022-11-17T20:50:55+5:302022-11-17T20:52:11+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: काँग्रेस कडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे या लोकांना चाप लावणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्या संपूर्ण राज्यातून महाराष्ट्र सैनिक शेगावला पोहचतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वा . सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले . त्याचा तीव्र निषेध गुरुवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला . यावेळी मनसे चे प्रवक्ते संदीप देशपांडे , मनसे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव , माजी नगरसेवक संतोष धुरी , ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासहमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी , महाराष्ट्र सैनिक ,अंगीकृत संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राहुल गांधींचा निषेध करण्यात आला.
काँग्रेसची ताकद काय आहे हे आम्ही पहिले आहे, त्यांना वलग्ना करण्याची काही गरज आहे का ? ते ३० हजार असतील तरी आम्ही ३०० पुरे आहोत. आता पपू ची पप्पूगिरी उतरवायला आम्ही एकत्र शेगावला चाललेलो आहोत आणि पपूची पप्पूगिरी आम्ही नक्की उतरवू असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे बोलले त्याचा साधा कडक शब्दात निषेध पण शिवसेना करत नाही , ते सावरकरांच्या भारतरत्नाची मागणी करणार ? असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान जर होणार असेल तर त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचा पुनरुचार देशपांडे यांनी केला .
उदयानंतर राहुल गांधी कधीही महाराष्ट्रात सभा घेण्याची हिंमत करणार नाही एवढं नक्की. आम्हाला पोहचुन दिले तर आम्ही असू तिथे आणि आम्हाला पोहचून दिले नाही तर आमचे महाराष्ट्र सैनिक सक्षम आहेत त्यांना माहित आहे गनिमी कावा कसा करायचा ? या सभेत महाराजांनी केलेल्या गनिमी काव्याचा प्रत्यय सगळ्यांना दिसेल असा इशारा मनसे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी दिला .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"