शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते', २६/११ बाबतच्या वादावरून एकनाथ शिंदे यांची टीका

By अजित मांडके | Updated: May 6, 2024 15:44 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

- अजित मांडकेठाणे - विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ असा घणाघात केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंज चीड  आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वड्डेटीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.  आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असे त्यांनी सांगितले. वकिल उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगवला. 

नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे, असे दाखवून दिले. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर कॉंग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मिरबाबत बोटचेपी धोरण ठेवले. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्ताना नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते. आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला इशारा दिला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thane-pcठाणे