Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:13 IST2021-01-18T18:11:34+5:302021-01-18T18:13:32+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results: या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल
ठळक मुद्देजेसीबीने गुलाल उधळल्याची ही व्हिडीओ क्लिप परिसरात चांगलीच व्हायरल झाली आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडीत ५३ ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तालुक्यातील चर्चेत असलेल्या खारबाव ग्रामपंचायतीवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे. या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
खारबाव ग्राम पंचायतीच्या अगोदर असलेल्या वडघर गावात राष्ट्रवादीचे नेते महेंद्र पाटील पोहोचले असता कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर गुलाल उधला आणि एकच जल्लोष केला. जेसीबीने गुलाल उधळल्याची ही व्हिडीओ क्लिप परिसरात चांगलीच व्हायरल झाली आहे.