शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेसह भाजपालाही दणका; मनसेने फडकवली विजयी पताका

By मुकेश चव्हाण | Updated: January 18, 2021 13:08 IST

काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे.

मुंबई:  राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

आपले 'मनसे'; अभिनंदन! 💐✌️💐

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021

त्यातील मनसेचे नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे. तसेच रत्नागिरीच्या दापोलीत देखील मनसेने खातं उघडलं आहे. दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु शेवटच्या दीड तासात म्हणजे ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तहलीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला.

तालुकानिहाय मतदान

तालुका    ग्रा.पं.    मतदान    टक्केवारीमुरबाड    ३९    २३०४२    ७०.७२अंबरनाथ    २६    २७,७७१    ७४.७६भिवंडी    ५३    ८९,८५५    ७५.४४कल्याण    २०    ३२,०८३    ६०.६०शहापूर    ५    ५८६२    ६७.०० 

टॅग्स :MNSमनसेgram panchayatग्राम पंचायतambernathअंबरनाथRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा