शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:40 IST

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला.

ठाणे - तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे आपले सरकार तरेल आणि आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, या आशेवर असलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांचे अवसान आता पार गळाले आहे.महाविकास आघाडी सत्तारुढ होण्याची वेळ जवळ येताच ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आता सत्तेत आपलं गणित कुठे आणि कसं जुळेल, याची गणितं बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाची खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांचीही नावे आता आघाडीवर आली आहेत. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यताही आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपने स्थापन केलेल्या सरकारचे आयुष्य अवघे तीन दिवसांचे ठरले. सुरुवातीला भाजपची सत्तेची समीकरणे जुळत असल्याचे दिसत असल्याने भाजपचे जिल्ह्यातील नेते मंत्रीपद मिळणार म्हणून आशावादी झाले होते. यामध्ये रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, गणेश नाईक, संजय केळकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र सत्तास्थापनेचे स्वप्न अवघ्या तीनच दिवसात भंगल्याने या सर्वांचाच हिरमोड झाला.अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ठाण्याचे विशेष महत्त्व होते. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील नेत्यांनी या राजकीय घडामोडींमध्ये मोठी खिंड लढवली. फुटलेल्या आमदारांना परत आणणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांची बडदास्त राखण्याचे महत्त्वाचे काम शिंदे आणि आव्हाड यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे युती सरकारमध्येही महत्त्वाचे खाते आहे. आता शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांना यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळू शकते. एकनाथ शिंदे हे पुन्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि कॅबीनेटमध्येही महत्वाचे पद त्यांना पुन्हा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांना गृहखाते, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाडांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, त्याचबरोबर कॅबीनेटमध्ये शालेय खाते किंवा वैद्यकीय खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र फाटक यांनाही राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, सरनाईकांच्या वाट्याला काय येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मनसे आमदाराचे राष्ट्रवादीच्या कोट्यातून भलेमागील कित्येक वर्षांपासून महत्वाच्या पदांसाठी डावलले गेलेले शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना येत्या काही महिन्यांत नव्या समीकरणामुळे बढती मिळण्याची चिन्हे आहे.पक्षाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचीही नावे विधानपरिषदेसाठी पुढे आले आहे.विशेष म्हणजे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्यालाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच राज्याच्या सत्तासमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड