शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सत्ता स्थापनेसाठी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाच्या वेळोवेळी सुरु असलेल्या बैठकांसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत आहे. मात्र, उर्वरित वेळ आम्ही मतदारसंघासाठी देत असल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताचे धनुष्य पक्ष सहज पेलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी व्यक्त केला. मात्र, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला मतदारसंघातच राहायला सांगून, आवश्यकता असेल तेव्हा मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत.सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र जिल्ह्यातून गायब झाले आहेत. शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आ. प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा आणि श्रीनिवास वणगा हेदेखील पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी आ. जितेंद्र आव्हाड हे राज्यस्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रस्थानी दिसत असून, शहापूरचे आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत गेल्याने चर्चेत आले. मात्र, आपण शरद पवारांसोबतच असल्याचा व्हिडीओ त्यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बहुमत मिळेल. त्यानुसार, रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत असून प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे, त्यानुसार काम सुरू आहे. सर्व घडामोडींवर दिल्ली ते गल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.- आ. रवींद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री, भाजपभाजपचे सरकार येईल, यात शंका नाही. आम्हाला मतदारसंघामध्येच कार्यरत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. गरजेनुसार दोन तासांत मुंबईला यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्वआम्हाला बंदिस्त ठेवण्याची पक्षाला गरजच नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसमवेत मी काम केलेले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व राज्याला लाभल्याने विकासकामे झपाट्याने होतील. मी आजपर्यंत विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. यावेळीही पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.- आ. किसन कथोरे,मुरबाड मतदारसंघउल्हासनगरच्या लाखो मतदारांनी सरकारच्या विकासरथाला बघून मतदान केले आहे. त्यामुळे मतदारांसाठी आम्ही सगळे मतदारसंघातच असून कुठेही गेलेलो नाही. पक्षश्रेष्ठींच्या अहोरात्र संपर्कात आहोत.- कुमार आयलानी, उल्हासनगरशेवटी काय तर हिस्से, वाटे यासाठीच सारे काही आहे. हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत असून, लाखो मतदारांची ही शोकांतिका आहे. मी स्वत: या परिस्थितीवर फारसे बोलू शकत नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट मी बघत आहे. मात्र, मतदारसंघात माझे काम सुरू आहे. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे दिसते.- आ. प्रमोद (राजू) पाटील, मनसे नेते, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारthaneठाणे