शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 1:46 AM

Maharashtra Election 2019: समस्यांच्या नावाने बोंबाबोंब, मतदानालाही ठेंगा

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील विविध नागरी समस्यांप्रकरणी स्थानिक नागरिकांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मानसिकता मतदारांची नाही. हे मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बंडखोरी झालेल्या या मतदारसंघात घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाच्या मुळावर उठते, हे चित्र गुरुवारी मतमोजणीतून समोर येईल.

कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत. गणपत गायकवाड (भाजप), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), अश्विनी थोरात-धुमाळ (वंचित बहुजन आघाडी) सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक) अभिजीत त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार येथे आहेत. यात शिवसेनेचे धनंजय बोडारे आणि काँग्रेसचे शैलेश तिवारी हे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

कल्याण पूर्वेतील समस्या नेहमीच चर्चेत असतात. तलावांची दूरवस्था, डम्पिंग नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, ड्रेनेजचा अभाव, नादुरुस्त आणि अरुंद रस्ते, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे, धोकादायक इमारतींचा प्रश्न, सरकारी रुग्णालयाची वानवा, उद्यान आणि मैदानांची कमतरता, पाणीसमस्या, विरंगुळा केंद्र नसणे, विकासकामांमुळे बाधित होणाºया रहिवाशांच्या पुनर्वसनाची बोंब, यामुळे येथील नागरिक त्रासलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही हे मुद्दे अग्रस्थानी राहिले. त्याचबरोबर आरक्षणाच्या जागा बळकावण्यासह बेकायदा बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उमेदवारांकडून झाडल्या गेल्याचेही दिसून आले.

पूर्व मतदासंघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे मनोज तिवारी, श्वेता शालिनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात पायधुळ झाडली आहे. यासर्वच नेत्यांनी मतदारांना भरघोस मतदान करा, असे आवाहन केले होते. निवडणूक आयोगानेही मतदान जागृतीचे कार्यक्रम राबवून मतदान करा, अशी हाक दिली होती.

मात्र, समस्यांच्या मुद्यावर याठिकाणी भरघोस मतदान करून मतदार आपल्यातील संताप व्यक्त करतील, असा दावा जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. परंतु, मतदारांनी पाठ दाखवून तो फोल ठरविला आहे. याठिकाणी तीन लाख ४५ हजार ६६६ एकूण मतदार आहेत. यापैकी केवळ एक लाख ५० हजार ५३५ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, एक लाख ९५ हजार १३१ मतदारांनी मात्र मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी ४३.५५ इतकी मर्यादित राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तीन लाख १२ हजार ५४४ मतदार होते. त्यावेळी एक लाख ४१ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा मतदारांची संख्या वाढूनही मतदान वाढलेले नाही. ४३.५५ टक्के मतदान झाले असून दीड टक्क्याच्या आसपास टक्केवारी घसरली आहे.

मतदारांनी फिरवलेली पाठ लोकशाहीसाठी मारक

पूर्वेतील मतदार विविध नागरी समस्यांमुळे पिचलेला आहे. केडीएमसी असो अथवा केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असतानाही कोणतीही विकासाची कामे पूर्वेत झालेली नाहीत. त्यामुळे नाराजीतून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यात एकीकडे महागाई, खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा मुद्दा काश्मीर ३७० कलम रद्द करणे, असो अथवा दहशतवाद, यासारख्या विषयाभोवतीच आवर्जून राहिला. यामुळे मतदार नाराज झाले आणि त्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीतून दिसून आले.- जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी आमदार, विधानपरिषद

नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे. लोकांचा मतदानाबाबत असलेला निरुत्साह दूर झाला पाहिजे. जर मतदानच केले नाही तर निरुत्साह कसा दूर होईल. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांकडून नेहमीच मतदान करा, असे आवाहन केले जाते. परंतु, मतदार त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लोकशाहीसाठी मारक आहे.- गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान