शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 01:11 IST

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर, काँग्रेसनेही हा मतदारसंघ सोडण्याची तयारी केलेली नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी मागील विधानसभा आणि त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून आघाडीला फारशी मते मिळालेली नाहीत. त्यामुळे सध्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशीच फाइट दिसत असून मनसे कितपत टक्कर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. परंतु, हा मतदारसंघ मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, या मतदारसंघाची मागणीच करण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली आहे. दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेक इच्छुकांनी आव्हान दिले आहे. मात्र, पक्षाने केळकर यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समीकरण निश्चित झाले होते. त्यानुसार, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी शब्द पाळत मीरा-भार्इंदरचा आपला उमेदवारही जाहीर केला आहे. परंतु, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यात काँग्रेसने या मतदारसंघावरील दावा अद्यापही कायम ठेवला आहे. त्यामुळेच कदाचित उमेदवारी अद्यापही निश्चित झाली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेकडून अविनाश जाधव यांचे नाव अंतिम झाले आहे.आता मनसे या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराती आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ५१०१० मते मिळाली होती, तर मनसेचे राजन राजे यांना ४८५६९ मते मिळाली होती. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६२८८ मते मिळाली होती. तर, आघाडीशी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाºया राष्टÑवादीच्या देवराम भोईर यांनीसुद्धा येथून १७२४४ मते मिळवली होती.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा दारुण पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८२९६ मते मिळाली होती. तर, भाजपचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्कयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही मनसेलासुद्धा बांधता आलेला नाही. त्यात महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. परंतु, मागील दीड ते दोन वर्षांत मनसेच्या माध्यमातून झालेल्या विविध आंदोलनांच्या मराठी विरुद्ध गुजराथी अशा रंगलेल्या वादात मनसेने घेतलेली उडी या सर्वांचा किती फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेBJPभाजपा