शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:04 PM

Maharashtra Election 2019: मतांसाठी मराठीचा कैवार; निवडणूक प्रतिज्ञापत्रात मात्र इंग्रजीचा आधार

- पंकज रोडेकरठाणे : मराठी भाषेच्या नावाने राजकारण करणाऱ्या मनसेने जिल्ह्यातील १८ पैकी १४ मतदारसंघांमध्ये मनसे नेता, सरचिटणीस, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष आदी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामधील मनसे नेते, ठाणे जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्षांसह दोघांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे चक्क इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे या प्रमुख मनसे नेत्यांना मराठी भाषेचा विसर पडल्याचे प्रखरतेने दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांतील उमेदवारांनी प्रामुख्याने मातृभाषेतून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.विधानसभेला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, शहापूर, मुंब्रा-कळवा आणि कल्याण पूर्व हे चार मतदारसंघ वळगता इतर १४ मतदारसंघांमध्ये मनसेने उमेदवार दिले आहेत. यामधील नऊ मतदारसंघांतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना मराठी भाषेत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार व मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कोपरी-पाचपाखाडीतील महेश कदम, ओवळा-माजिवडामधून मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील आणि मीरा-भाईंदरमधून हरेश सुतार या उमेदवारांनी इंग्रजी भाषेतच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे वारंवार मराठी भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या मनसेच्या ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी मराठी बाणा बाजूला ठरवत इंग्रजीची कास धरल्याचे प्रतिज्ञापत्रांतून दिसत आहे. त्यामुळे यातून नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.चार उमेदवार दहावी पासठाणे जिल्ह्यातील १४ मतदारसंघांतून मनसेच्या १७ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये भिवंडी पश्चिम येथून दोघांनी, भिवंडी पूर्व येथून तिघांनी, तर अन्य उमेदवारांनी इतर मतदारसंघांतून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज भरला. त्यातील पाच जणांनी इंग्रजीतून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यापैकी चौघे दहावी असून, एक जण बीएससी आहे. इंग्रजीतून प्रतिज्ञापत्र सादर करण्याची कारणे त्यापैकी काही उमेदवारांनी विचारली असता, घाईगडबडीत हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारी अर्ज मराठीतच सादर केला असून, प्रतिज्ञापत्र इंग्रजीत दिल्याचा अर्थ मनसेने मराठीची कास सोडली, असा होत नसल्याचेही या उमेदवारांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसे