शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा भाईंदरमध्ये धार्मिक मुद्दे आघाडीवर

By धीरज परब | Updated: November 16, 2024 15:17 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात धार्मिक मुद्यावरच प्रामुख्याने प्रचार केला जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते व प्रचारासाठी येणारे नेते देखील धार्मिक मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत. 

मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात धार्मिक मुद्यावरच प्रामुख्याने प्रचार केला जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते व प्रचारासाठी येणारे नेते देखील धार्मिक मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत. 

निवडणुकीत विद्यमान आमदार गीता जैन अपक्ष म्हणून तर माजी आमदार नरेंद्र मेहता भाजपाचे व मुझफ्फर हुसेन हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने रिंगणात आहेत. त्याचसोबत मनसेचे संदीप राणे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा  माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हंसूकुमार पांडे हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. 

निवडणुकीत शहरातील विकासकामे, समस्या, भ्रष्टाचार, राजकीय गुंडगिरी, घोटाळे आदींपेक्षा धार्मिक मुद्द्यावर प्रकर्षाने भर दिला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील निवडणूक मुख्यत्वे जैन आणि मेहता व त्यांच्या समर्थकांकडून धार्मिकतेवर लढवली जात असल्याचं दिसत आहे. अतिरेकी याकूब मेमन याची फाशी माफ करण्याचे  मुझफ्फर यांची खोटी स्वाक्षरी असलेले बनावट पत्र भाजपाच्या मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर करून मुझफ्फर यांच्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रकार केला त्याबद्दल पोलिसांनी मेहता समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात आणखी आरोपी वाढणार आहेत. 

तर भाईंदरच्या तारोडी - चौक येथील धार्मिक स्थळाच्या बेकायदा बांधकामचा वापर देशविघातक अतिरेकी कारवायासाठी केला जाऊ शकतो तसेच केशवसृष्टी येथे भाजपा, आरएसएस आदींचे मोठे नेते येत असल्याने त्यांना धोका होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अहवाल असताना त्या धार्मिक स्थळास मेहतांनी निधी व संरक्षण दिल्याचा मुद्दा आ. जैन समर्थक हे मेहतां विरुद्ध समाज माध्यमांवर उचलत आहेत. 

विशिष्ट धर्माचे आम्हीच पाठीराखे आहोत असे आ. जैन व मेहतांकडून सातत्याने प्रचारात मांडले जात असून मुझफ्फर यांना धर्माच्या आधारे लक्ष केले जात आहे. परंतु मुझफ्फर यांनी देखील मंदिरांमध्ये दर्शना सह जैन व मेहता यांना धार्मिक ग्रंथ आणि धर्मावर जाहीर चर्चा करण्याचे आवाहन दिले. इतकेच काय तर त्यांनी देवी - देवतांच्या नावाचा जयघोष जाहीर सभांमध्ये करून जैन व मेहतांच्या धार्मिक प्रचारावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेष म्हणजे मीरा भाईंदर शहराचा मोठ्या लोकवस्तीचा भाग ज्या ओवळा माजिवडा मतदार संघात येतो तिकडे मात्र मीरा भाईंदर मतदार संघाप्रमाणे धार्मिक मुद्दा प्रचारात चर्चेत दिसत नाही हे विशेष. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४