शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील

By संदीप प्रधान | Updated: November 5, 2024 06:07 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता दाखवणारा ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहणार की स्व. आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करणार, याचे उत्तर निकालातून मिळणार आहे.

- संदीप प्रधानठाणे - शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता दाखवणारा ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहणार की स्व. आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करणार, याचे उत्तर निकालातून मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने शिंदेसेनेला बळ दिले. मात्र, महायुतीमधील भाजपला भिवंडी लोकसभेतील पराभवाने झटका मिळाला. महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरांनी काही प्रमाणात ग्रासले आहे. मात्र, ठाणेकर थेट कौल देतील, अशी अपेक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी लढत, चुरस आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये शिंदेसेना व भाजप यांच्यातही चुरस आहे. मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळवण्याकरिता शिंदेसेनेला ठाण्यावर वर्चस्व प्राप्त करायचे आहे, तर भाजपही जिल्ह्यात मोठा भाऊ होण्याकरिता प्रयत्नशील आहे. भिवंडी लोकसभेतील विजयामुळे शरद पवार गटाच्या ठाणे जिल्ह्यात पाळेमुळे मजबूत करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  काँग्रेसला यावेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेस निराश आहे. यातूनच महायुती व मविआत बंडखोरीचे पीक आले.

कोपरी-पाचपाखाडीत काँग्रेसचे बंडठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. भाजपचे संजय केळकर, उद्धवसेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात लढत आहे. मागील वेळेस जाधव यांचा २० हजार मतांनी पराभव झाला होता. आता या मतदारसंघात उद्धवसेनेचा उमेदवार असल्याने ही अटीतटीची लढत होणार आहे. कोपरी पंचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत उद्धवसेनेचे केदार दिघे यांच्यासोबत होत आहे. उद्धवसेनेने याठिकाणी ‘दिघे कार्ड’ खेळले आहे. ते कितपत चालणार, याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी बंडखोरी केल्याने उद्धवसेनेकरिता अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या लढतीत काँग्रेसने बिब्बा घातला. 

ओवळा माजीवडा या मतदारसंघात शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेकडून त्यांचे पूर्वीचे निकटवर्ती नरेश मणेरा हे मैदानात उतरले आहेत. मनसेने या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप पाचंगे यांना संधी दिली आहे. या तिरंगी लढतीत सरनाईक यांचे मताधिक्य वाढते का कमी होते, हेच पाहणे महत्त्वाचे आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघात गुरू-शिष्य लढत आहे. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात थेट लढत आहे. मनसेने सुशांत सूर्यराव हा उमेदवार दिला आहे. सूर्यराव यांना किती मते मिळतात, यावर आव्हाड यांचे मताधिक्य ठरणार आहे.

गायकवाड विरुद्ध गायकवाडडोंबिवलीत भाजप विरुद्ध उद्धवसेनेत थेट लढत बघायला मिळणार आहे. शिंदेसेनेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी उद्धवसेनेत गेलेले दीपेश म्हात्रे यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हान असणार आहे. चव्हाण यांना भाजपने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून म्हात्रे हे दुसऱ्यांदा चव्हाण यांच्यासमोर विधानसभा निवडणूक लढत आहेत. 

कल्याण पूर्व मतदार संघात भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. सुलभा यांचे पती आ. गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यामुळे महेश यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची बंडखोरी सुलभा यांना डोकेदुखी ठरणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. महाविकास आघाडीने धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे सचिन पोटे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, ती रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले. 

कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिंदेसेनेकडून विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात उद्धवसेनेचे सचिन बासरे यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आले. मात्र, भाजपचे वरुण पाटील यांचे बंड कायम आहे. काँग्रेसचे राकेश मुथा यांची बंडखोरी बासरे यांची डोकेदुखी वाढवू शकते. 

कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेकडून राजू पाटील, उद्धव सेनेकडून सुभाष भोईर, तर शिंदे सेनेकडून राजेश मोरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ शिंदेसेनेला मिळाली. त्यामुळे शिंदेसेना पाटील यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी अपेक्षा होती; परंतु मोरे यांनी अर्ज दाखल केला. तीन सेनांचे उमेदवार रिंगणात असल्याने मराठी भाषकांच्या मतांचे  विभाजन होण्याची शक्यता आहे. 

ऐरोली, बेलापुरात शिंदेसेनेचे बंडऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी, तर बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या विजय नहाटा यांनी बंडखोरी केली आहे. नाईक यांच्या विरोधात उद्धवसेनेचे एम. के. मढवी, तर म्हात्रे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे संदीप नाईक हे रिंगणात आहेत. शिंदेसेनेच्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघात विद्यमान आ. गीता जैन, भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता व काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसैन अशी तिरंगी लढत आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील भीषण वाहतूक कोंडी व त्यामुळे होणारी कुचंबणारेल्वे वाहतुकीचा घोळ व त्यातून होणारा लेटमार्क आणि रेल्वेतून पडून होणारे मृत्यूजिल्ह्यातील सर्व शहरांमधील नागरिकांना भेडसावणारी प्रचंड पाणीटंचाईजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील कचऱ्याची समस्या. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व्यवस्थेचा अभाववाढती गुन्हेगारी ही देखील या ठिकाणची मोठी समस्या बनली आहे. अपुरे पोलिस बळ व त्या तुलनेत वाढती लोकसंख्या याचा मेळ बसत नाही.

भिवंडीत उद्धवसेनेच्या बंडखोराची माघारभिवंडी पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीने समाजवादी पक्षाचे रईस शेख निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेचे रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला. भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली. चोरघे यांच्या विरोधात माजी महापौर विलास पाटील यांनी बंडखोरी केली. भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली. 

उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध शरद पवार गटाचे ओमी कलानी अशी लढत होत आहे. अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी बंड केले. महायुतीला हे बंड रोखता आले नाही. मुरबाड मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे विरुद्ध शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार गटाचे शैलेश वडनेरे यांचे बंड कायम आहे. अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे बालाजी किणीकर विरुद्ध उद्धवसेनेचे राजेश वानखेडे यांच्यात सामना आहे. येथे काँग्रेसचे सुमेध भवार यांनी बंड केले आहे. शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा विरुद्ध शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यात थेट सामना आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा