अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 20:54 IST2021-04-01T04:41:45+5:302021-04-02T20:54:57+5:30
Rape : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरा रोडच्या पय्याडे हॉटेल भागात छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजला अटक
भाईंदर : अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नयानगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. मीरा रोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरा रोडच्या पय्याडे हॉटेल भागात छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. त्यामध्ये एक १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा समावेश होता. नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता, एका महाराजने तिच्यावर अनेकदा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्या ६० वर्षीय महाराजला अटक केली आहे. हा महाराज भगवे कपडे घालून पूजापाठसाठी जात असे. तो धार्मिक स्थळी पूजापाठ करण्यास जात होता का? याची शक्यताही पडताळली जात आहे. त्याच्या घरीही दरबार भरत असे. १५ वर्षांपासून हा महाराज शहरात बस्तान मांडून आहे. नयानगर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.