महानगर गॅस पाईप लाईनच्या मीटरचे स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:18 IST2019-04-03T15:16:44+5:302019-04-03T15:18:17+5:30
यामध्ये कोणाही जखमी किंवा अनुचित घटना घडलेली नसली तरीही रहिवासी भीतीने घराबाहेर पडले आहेत.

महानगर गॅस पाईप लाईनच्या मीटरचे स्फोट
डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरात मंगळवारी महानगर गॅसकडून पाईपद्वारे गॅस काही सोसायट्यांमध्ये देण्यात आला आहे. यापैकी शर्वरी सोसायटी मधील तीन घरांमध्ये गॅस मीटरचे स्फोट झाल्याची घटना घडली.
यामध्ये कोणाही जखमी किंवा अनुचित घटना घडलेली नसली तरीही रहिवासी भीतीने घराबाहेर पडले आहेत. याबाबत महानगर गॅसच्या संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. पण अद्याप कोणीही आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी निलेश काळे यांनी सांगितले.