महाडचा विशाल चौगुले ठरला ‘आमदार श्री २०१७’चा मानकरी

By Admin | Updated: April 28, 2017 00:17 IST2017-04-28T00:17:36+5:302017-04-28T00:17:36+5:30

शिवसेना-युवासेना पुरस्कृत ओम साई मित्रमंडळ आदर्श नगर बिरवाडी महाड यांनी रायगड जिल्हा संघटनेच्या मान्यतेने आयोजित

Mahad's huge quadrangle becomes 'MLA Mr. 2017' | महाडचा विशाल चौगुले ठरला ‘आमदार श्री २०१७’चा मानकरी

महाडचा विशाल चौगुले ठरला ‘आमदार श्री २०१७’चा मानकरी

बिरवाडी : शिवसेना-युवासेना पुरस्कृत ओम साई मित्रमंडळ आदर्श नगर बिरवाडी महाड यांनी रायगड जिल्हा संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘आमदार श्री २०१७’ चा किताब शिवसमर्थ जिम महाडच्या विशाल चौगुले यांनी पटकावला आहे, तर अलिबागचा जयेंद्र मयेकर बेस्ट पोझर ठरला आहे.
महाडचे आ. भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये आमदार श्री २०१७ चा किताब पटकविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, महाड ,माणगाव, पेण, इंदापूर, पनवेल, खालापूर येथील सुमारे २३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील ५५, ६०, ६५, ७०, ७५ किलो वजनी गटामध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांमधून आमदार श्री २०१७ ची निवड करण्यात आली. हा किताब महाडच्या विशाल चौगुले यांनी पटकाविला तर अलिबागचा जयेंद्र मयेकर हा बेस्ट पोझर व उपविजेता ठरला तसेच तृतीय क्र मांक माणगावच्या विनायक लोखंडे यांनी मिळवला आहे.
या स्पर्धेकरिता पंच म्हणून सुनील नाहे, राजेश अनगत, विजय खरोसे, किशोर नारकर, रमेश खरे या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पंचांनी काम पाहिले. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी केले तर पारितोषिक वितरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, राजिप सदस्य मनोज काळीजकर, संजय कचरे, बिरवाडी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनीष सावंत, उपाध्यक्ष भरत शिंदे, राहुल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Mahad's huge quadrangle becomes 'MLA Mr. 2017'