शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जादूचा चष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:28 IST

आपल्या सभोवतालचे तंत्रज्ञान जितक्या झपाट्याने बदलत आहे

- शिल्पा कुलकर्णी-मोहिते

आपल्या सभोवतालचे तंत्रज्ञान जितक्या झपाट्याने बदलत आहे, आविष्कार आणि चमत्कार या दोन शब्दातील अंतर तितक्याच झपाट्याने कमी होत आहे. तुम्ही हॉलिवूडच्या अ‍ॅक्शन फिल्म्स्मध्ये बघितले असेल, नायक डोळ्यात लेन्स घालतो आणि त्याला सगळी माहिती डोळ्यासमोर दिसू लागते. काहीसे असेच तंत्रज्ञान आता गॅजेटप्रेमी ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे, ज्याला ए.आर. म्हणजे आॅगेमेंटेड रीयालिटि ग्लासेस म्हणतात. मूलत: हा एक विशेष चष्म्यासारखा दिसणारा चष्मा असतो. हा चष्मा जेव्हा स्मार्ट फोनला कनेक्ट केला जातो तेव्हा सुरू होते या चष्म्यातली खरी जादू.

ए.आर. चष्म्याची काच साधारण काच नसून चष्म्याला स्मार्ट बनवणारा एक कंबायनर असतो. नावाप्रमाणेच कंबायनर डोळ्यांनी बघता येणारी वास्तविकता आणि फोनकडून आलेली डिजिटल माहिती एकत्र करण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही ए.आर. चष्मा घालता तेव्हा तुम्हाला दुहेरी स्त्रोताच्या प्रतिमा दिसतात. एका लेन्समधून नैसर्गिक प्रकाशामुळे दिसणाऱ्या बाहेरील वास्तविक जगाची प्रतिमा आणि दुसरी डिजिटल प्रतिमा. वास्तविक जगाची प्रतिमा टिपण्यासाठी चष्म्यावर एक कॅमेरा बसवलेला असतो. कंबायनर या दोन प्रतिमा एकत्र करून ओलेड किंवा एलईडी डिस्प्लेवर प्रदर्शित करतो. पण या चष्म्याच्या बºयाच मर्यादा आहेत. दिसणारी प्रतिमा कॅमेºयाच्या रेंज आणि क्लॅरिटीवर अवलंबून असते.

या मर्यादा ओलांडण्यासाठी काही कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले चष्मे आणले आहेत, जे बरेचसे साधारण चष्म्यासारखे दिसतात. पण त्याच्या एका बाजूच्या काचेवर बसवलेली असते एक खास होलोग्राफिक फिल्म. यांना फोकल किंवा होलोग्राफिक ग्लासेस असेही म्हणतात. मजकूर आणि प्रतिमा तयार करण्यासाठी चष्म्याच्या बाजूला एक लेझर प्रोजेक्टर असतो. हा प्रोजेक्टर लाल, हिरवा आणि निळा असे तीन रंगाचे किरण निर्माण करतो. हे तीन रंग वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र करून कोणताही रंग तयार होऊ शकतो. प्रोजेक्टरमधून लेझर किरणे बाहेर पडण्यापूर्वी त्याला काही अंशांनी वाकवले जाते, ज्यामुळे ही किरणे नेमकी होलोग्राफिक फिल्मवर पडतात. होलोग्राफिक फिल्म एखाद्या आरशासारखी काम करते आणि ती किरणे डोळ्याकडे वळवून आपल्याला मजकूर किंवा प्रतिमा दर्शविते. पूर्वीच्या डिजिटल स्क्रीनच्या विपरीत, फोकल्सवरील मेसेज केवळ त्याच्या धारकाच्या डोळ्यालाच दिसू शकतो, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी देखील गोपनीयता पाळता येते.

स्मार्ट फोनवरील माहिती फोन न उचलता तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकते. फोकल्स नियंत्रित करण्यासाठी एक छोटी अंगठी वापरता येते. ही अंगठी एखाद्या कॉॅम्प्युटरच्या माऊससारखे काम करते. यावरच्या बटणाने हवे तेव्हा चष्म्यावरचे मजकूर दिसणे बंद, चालू करता येते. काही चष्म्यांना जोडलेले इअर फोन आणि माइकदेखील असतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता अजून वाढते. फोकल्सचा उपयोग नेव्हिगेशन म्हणजे रस्ता शोधण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो.

लवकरच भविष्यात व्हिज्युअल रिकॅग्निशन आणि फेस रिकॅग्निशनसारख्या तंत्रांबरोबर हे चष्मे जोडले जातील. मग टुरिस्ट जागांवर त्या जागेबद्दल माहिती सांगण्याचे गाइडचे काम हे चष्मेच करतील किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिला भेटताच, त्याचे नाव, गाव, आवडी, निवडी आणि बरचं काही निव्वळ सेकंदात तुमच्या डोळ्यासमोर येईल, इतक्या सहज मिळणाºया माहितीमुळे कदाचित निर्णय घेणे सोपे होईल किंवा अतिमाहितीमुळे गोंधळाचे होईल. (लेखिका या टेक्नोक्रॅट आहेत.)तंत्रज्ञानाचा आविष्कार आपण सारे अनुभवत आहोत. तंत्रज्ञानामुळे आपले जगणेच बदलून गेले आहे. गॅजेटप्रेमी ग्राहकांसाठी आता तर ए.आर. म्हणजे आॅगेमेंटेड रीयालिटि ग्लासेस बाजारात आले आहेत. विशेष चष्म्यासारखा दिसणारा हा चष्मा जेव्हा स्मार्ट फोनला कनेक्ट केला जातो तेव्हा सुरू होते या चष्म्यातली खरी जादू आणि लक्षात येते ती तंत्रज्ञानाची कमाल. या चष्म्याला स्मार्ट बनवणारा एक कंबायनर असतो. नावाप्रमाणेच कंबायनर डोळ्यांनी बघता येणारी वास्तविकता आणि फोनकडून आलेली डिजिटल माहिती एकत्र करण्याचे काम करतो.

टॅग्स :thaneठाणे