शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:22 IST

महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या

पेण : महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या सुबक मूर्तींवर रंगकामासह, डोळ्यांची नाजूक आखणी काम करण्यात गणेशमूर्तिकार मग्न झाले आहेत. श्रींची मूर्ती अधिकाधिक देखणी आकर्षक होईल, याकडे प्रत्येक मूर्तिशाळेचा भर असून, त्यासाठी कुशल कारागीर मेहनत घेत आहेत. पेणमधील दीपक कला केंद्र यासाठी आघाडीवर आहे. माघी गणेशोत्सवासाठी तब्बल १२००हून अधिक गणेशमूर्तींची मागणी विविध मूर्तिशाळांमध्ये आहे.वर्षाकाठी तीन वेळा गणरायांचे आगमन होते, भाद्रपद महिन्यातील मेगा गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीला गणरायांना निरोप दिल्यानंतर याच महिन्यात येणाºया संकष्टी चतुर्थीला साखरचौथ गणरायाचे आगमन होते. यानंतर गणरायाचे थेट आगमन माघी गणेश जयंतीनिमित्त होते. माघ महिन्यात सध्या माघी गणेशोत्सव साजरा होतो. मात्र, माघी गणेश जयंतीचा उत्सव आता बाप्पावरील भक्तिभाव व श्रद्धेपोटी सार्वजनिक उत्सव मंडपांत सेलिब्रेशनसाठी सज्ज होऊ लागलाय. बाप्पाचे आगमन होणार म्हटले की, बाप्पांच्या आगमनाची तयारी म्हणून हौशी युवा मंडळे, महिला मंडळे यांची लगबग वाढली आहे. श्रींच्या मूर्तीची मागणी मूर्तिकारांकडे हौसेने केली जात आहे. सार्वजनिक मंडळाच्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी गणेशमूर्तिकार नेहमी सज्ज असतात. पेण शहरातील ३५० मूर्तिशाळा व हमरापूर जोहे विभाग श्री गणेशमूर्तिकलेच्या नगरीतील ४०० ते ४५० मूर्तिशाळांमध्ये सध्या माघी गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. अधिकृत मूर्तिशाळांमध्ये प्रत्यक्ष भेटीअंती आतापर्यंत विविध मूर्तिशाळांमध्ये १२००हून अधिक श्रींच्या मूर्तींची नोंदणी करण्यात आली आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून माघी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सार्वजनिक गणेशमंडळे, तसेच बाप्पांचे भक्तगण घरगुती म्हणूनही श्रीची मूर्ती मोठ्या श्रद्धेने आणून उत्सव करू लागलेत.सध्या मूर्तिकारांकडे श्रींच्या मूर्तीचे रंगकाम, आखणी व इतर हिरे, स्टोन व कलाकुसरीसाठी चांगलाच वेळ मिळत असल्याने श्री गणेशाचा उत्सव भाद्रपदातला असो की माघी, पेणची श्रीची मूर्ती म्हणजे चैतन्याचे अनोखो प्रदर्शन असते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव