शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या अमिषाने बांग्लादेशी तरुणींना ढकलले शरीर विक्रयाच्या व्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 23:06 IST

नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाऱ्या मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी अटक केली.

ठळक मुद्दे चार पिडित तरुणींची सुटका ठाणे गुन्हे शाखेची कारवाई कल्याणमधून एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन (३३, रा. हाजीमलंग रोड, कल्याण ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्या तावडीतून १९ ते २५ वयोगटातील चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण परिसरातील खून तसेच सेक्स रॅकेटमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन हा त्याच्या अन्य एका साथीदारासह बांग्लादेशातून नोकरीच्या अमिषाने फसवणूकीने आणलेल्या तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ डिसेंबर रोजी या परिसरात धाड टाकून कडलग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भगवान औटी, जमादार सुनिल चव्हाणके आणि हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना अनैतिक संबंधासाठी बांगलादेशातून आणल्याची कबूलीही त्याने या पथकाला दिली. त्याच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आता कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र