लोटन सोनार ठरले सर्वोत्कृष्ट शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:57+5:302021-09-10T04:47:57+5:30

अंबरनाथ : आयुध निर्माणी बोर्ड, कोलकाता यांच्यामार्फत २०२१ साठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा आयुध निर्माणी विद्यालय अंबरनाथ ...

Lotan Sonar became the best teacher | लोटन सोनार ठरले सर्वोत्कृष्ट शिक्षक

लोटन सोनार ठरले सर्वोत्कृष्ट शिक्षक

Next

अंबरनाथ : आयुध निर्माणी बोर्ड, कोलकाता यांच्यामार्फत २०२१ साठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा आयुध निर्माणी विद्यालय अंबरनाथ येथील विज्ञानविषय शिक्षक लोटन सोनार यांना देण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या आयुध निर्माणी बोर्डाकडून संपूर्ण भारतात एकूण २४ शाळा चालविण्यात येतात. या शाळांतून दरवर्षी सर्वोत्कृष्ट शिक्षकाची निवड करण्यात येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक पी. के. गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार देउन त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे अंबरनाथकरांसाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे.

सोनार हे आयुध निर्माणी विद्यालय, अंबरनाथ येथे १९९७ पासून कार्यरत असून, ते विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांची विज्ञान विषयातील रुची वाढविण्यासाठी ते सतत नवोपक्रम करत आलेले आहेत. विविध वैज्ञानिक संस्था भेटी, वैज्ञानिक प्रात्याक्षिके, राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुलांचा सहभाग अशा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या साथीच्या काळात, मुले प्रत्यक्ष शाळेत हजर राहू शकले नाहीत. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रमांच्या माध्यमातून, मुलांना शाळेशी जोडून ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केले. आपल्या घरातच प्रत्येक ठिकाणी विज्ञान आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणारी वैज्ञानिक कारणे शोधण्यासाठी मुलांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. आयुध निर्माणी विद्यलयास या सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने याआधी दाेन वेळा गौरविण्यात आले आहे. १९८४ ला गुर्जर मॅडम तसेच २००४ ला बेलगावकर मॅडम यांना हा पुरस्कार देउन गौरविण्यात आले होते.

--------------

फोटो आहे

Web Title: Lotan Sonar became the best teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.