शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

पालघर देतो, आमचे ठाणे आम्हाला देता का? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 09:00 IST

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे इच्छुक मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांनी माघार घेतली व ती जागा भाजपला मिळाली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता सामंत बंधूंच्या त्यागाची भरपाई म्हणून ठाणे शिंदेसेनेला मिळणार की, नाशिक गोडसेंना सुटल्याने ठाण्यावर भाजप दावा करणार, अशी चर्चा सुरू आहे.

पालघरवर पाणी सोडून ठाणे राखण्याचा पर्याय शिंदेसेनेकडे आहेच. नाशिकमधून अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा होती. शरद पवार यांच्या दरवाजापर्यंत गेलेल्या महादेव जानकर यांना भाजपने आपल्याकडे खेचून आणले व परभणीतून उमेदवारी दिली. यापूर्वी मराठा आरक्षण देऊन मराठा मतांच्या आधारे मैदान मारण्याचा प्रयत्न भाजपने केला होता.

- याआधी ओबीसींची नाराजी भाजपला महाग पडल्याने माळी, धनगर, वंजारी (माधव) समीकरण वसंतराव भागवत यांच्या काळापासून भाजपने जुळवले. - यावेळी लोकसभेत भुजबळ, जानकर व पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन त्याच ‘माधव’ फॉर्म्युलाचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र नाशिकमधील शिंदेसेनेचे हेमंत गोडसे हे उमेदवारीकरिता आग्रही होते. त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली.- नाशिक सोडल्याने ठाणे मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचणार की रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे गेल्याने शिंदेसेनेच्या पदरात ठाणे पडणार, याचीच चर्चा आता सुरू आहे. - ठाण्यात शिंदेसेना व भाजप दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी एक-दुसरा अपवाद वगळता सक्षम उमेदवार नाही. पालघरमध्ये खा. राजेंद्र गावित यांनी गेल्यावेळी शिवबंधन बांधून निवडणूक लढवली. त्यांना यावेळी भाजपतर्फे निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे पालघरच्या बदल्यात शिंदेसेना ठाणे आपल्याकडे राखू शकते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे