शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Lockdown: दाढीचे काय करायचे? गिऱ्हाईकांसह व्यावसायिकांमध्येही संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 00:50 IST

लक्ष्मीपार्क परिसरातील सरताज शेख यांचा अनुभव काहीसा वेगळा होता. त्यांनी प्रोफेशनल व्यावसायिकाप्रमाणेच दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवले

जितेंद्र कालेकर 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०५ दिवसांनी ठाण्यासह राज्यभरात नाभिक व्यावसायिकांना आपली केश कर्तनालयाची दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली. रविवारी कामाचा पहिलाच दिवस. गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने गिºहाईकांनीच पाठ फिरवली.

काही ठिकाणी गिºहाईकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि अवजारांचे निर्जंतूकीकरण करण्यातच बहुतांश वेळ गेल्याने अनेकांच्या पदरी पहिल्याच दिवशी निराशा पडल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. अनेक व्यावसायिकांची दुकाने नियमांचे पालन करीत १ जूनपासून सुरुही झाली होती; पण नाभिक समाजाला व्यावसायाची परवानगी नसल्याने नाराजी होती. आता सशर्त परवानगी मिळाली; पण पीपीई किट घालणे, केस कटींग करा पण दाढीला हात लावू नका, सॅनिटायजरपासून अवजारांचे निर्जंतूकीकरण करा, अशा अनेक अटी घातल्यामुळे नेमका व्यवसाय करायचा तरी कसा, असा सवाल नाभिक व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे.

ठाण्यात सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त सलून व्यावसायिक आहेत. गेल्या अडीच तीन महिन्यांमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जवळचे सर्व पैसे संपल्याने पीपीई किट, सॅनिटायझेशन किंवा अन्य बाबींसाठी लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची? केस कर्तनासाठी १० ते ५० रुपयांची वाढ केली, तर ठराविक लोक त्याचे स्वागत करतात. पण अनेकजण नाक मुरडणारेही आहेत, असे यशोधननगर येथील व्यावसायिक पुरुषोत्तम खरे यांनी सांगितले. पीपीई किट घालून काम करणे मोठे जिकरीचे असल्याचेही ते म्हणाले. पहिलाच दिवस, अगदी रविवार असूनही गिºहाईक नेहमीसारखे केस कटिंगसाठी फिरकलेच नाही. पुढे कसे होणार? पुन्हा लॉकडाऊन होते की काय? असे प्रश्न खरे यांच्या डोक्यात घरघर करत आहेत. कामापेक्षा अवजारांचे निर्जंतुकीकरण करण्यातच बराच वेळ गेल्याचेही ते म्हणाले.

लक्ष्मीपार्क परिसरातील सरताज शेख यांचा अनुभव काहीसा वेगळा होता. त्यांनी प्रोफेशनल व्यावसायिकाप्रमाणेच दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवले. चारपेक्षा अधिक गिºहाईकांना आत प्रवेश नाही. स्वत:ला मास्क आणि गिºहाईकांना नवे कोरे अ‍ॅप्रन दिले. अशा अनेक सोयी केल्याने केस कर्तनासाठी वाढीव दर आकारुनही गिºहाईकांनी स्वागत केले. तूर्त दाढी करण्याला परवानगी नाही, हे आमच्या आरोग्याच्यादृष्टीनेही योग्य असल्याचे ते म्हणाले.पीपीई किट तसेच निर्जंतूकीकरणाचे नियम नाभिक व्यावसायिकांनाही आवश्यक आहे. परंतू, पीपीई किट कापडी आणि सुटसुटीत मिळावे. पी१ आणि पी२ मधून या व्यावसायिकांना वगळावे. दाढी करण्यालाही परवानगी मिळावी. व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी. - अरविंद माने, खोपट, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस