शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्विकृतच्या एका जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्टÑवादीच्या श्रेष्ठींचे लॉबींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:31 IST

मागच्या दरवाज्याने पालिकेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी लॉबींग सुरु केले आहे. प्रशासनाने तुर्तास कॉंग्रेसच्या बाजूने झुकते माप दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शुक्रवारच्या महासभेत कोणती भुमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

ठळक मुद्देवेळ पडल्यास प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांशी टक्कर देऊराष्ट्रवादीची आक्रमक भुमिका

ठाणे - स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असतांनाच आता सदस्य निवडीचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एका सदस्य निवडीसाठी राष्ट्रवादीकडून थेट पक्ष प्रमुख शरद पवार यांनी आणि कॉंग्रेसकडून प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लॉबींग सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही प्रशासनाने कॉंग्रेसला शब्द दिल्याने राष्ट्रवादी महासभेच्या दिवशी काय भुमिका घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.                      शुक्रवारी महासभेत स्विकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु या निवडीबाबत किबंहुना राष्ट्रवादीचे तौलानिक संख्याबळ अधिक असतांनासुध्दा पालिका प्रशासनाने कॉंग्रेसच्या सदस्याची स्विकृतपदासाठी वर्णी लावण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यातही प्रशासन कॉंग्रेसच्या सदस्य निवडीबाबत ठाम असल्याने राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोहर साळवी यांच्या नावावर सर्वांनीच ठाम भुमिका घेतली असून वेळ पडल्यास सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भुमिकासुध्दा घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. दरम्यान, मनोहर साळवी यांचे शरद पवार यांच्याशी जुने संबध असल्याने खुद्द पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना फोन करुन साळवी यांच्या नावाची शिफारश केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या वतीने मनोज शिंदे यांच्या नावासाठी थेट प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. त्यात राष्ट्रवादीला मिळालेल्या माहिती नुसार प्रशासन कॉंग्रेसच्या सदस्याची निवड करण्यावर ठाम आहे. त्यामुळेच आम्ही आक्रमक भुमिका घेतली असल्याची माहिती शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतली.एकूणच मागील दारातून प्रवेश मिळविण्यासाठी प्रथमच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीच लॉबींग केल्याने यात कोणाची सरशी होणार हे आता शुक्रवारच्या महासभेतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस