शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

बारवीच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:27 AM

एमआयडीसीने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र सुनावणीवेळी न्यायाधीशांसमोर न आल्याने आणखी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलली.

सुरेश लोखंडे ठाणे : बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊ न राहावे लागत आहे. मुरबाड तालुक्यातील काळे वडखळ, तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची न्यायालयीन सुनावणी रखडल्यामुळे त्यांच्यावरील जलसमाधीचे संकट गडद झाले आहे. एमआयडीसीने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र सुनावणीवेळी न्यायाधीशांसमोर न आल्याने आणखी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलली.बारवीच्या पाणलोट क्षेत्रात राहणाºया ग्रामस्थांवर जलसमाधीचे संकट असल्याने त्यांनी एमआयडीसीविरोधात पुनर्वसनासाठी मुंबई उच्च न्यायालयात आधीच धाव घेतली आहे. मात्र, एमआयडीसीतर्फे न्यायाधीशांसमोर मंगळवारच्या सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्रच न्यायाधीशांसमोर न आल्याने ग्रामस्थांनी मांडलेल्या मुद्द्यांचा संदर्भ लागत नसल्याने ही सुनावणी आठवडाभर पुढे ढकलल्याचे या ग्रामस्थांची बाजू मांडणाºया श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पुनर्वसनाबाबत दाखवलेल्या निष्काळजीबद्दल न्यायालयाने प्रारंभी एमआयडीसीला धारेवर धरले. तसेच एक आठवडाभरात म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर सुनावणी पुन्हा आठवडाभर पुढे ढकलली.दरम्यान, एमआयडीसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. पण, १६ जूनच्या सुनावणीच्या दिवसापर्यंत ते न्यायालयासमोर आलेच नाहीत. त्यामुळे सुनावणी आता एक आठवड्यापर्यंत थांबवल्याचे अ‍ॅड. तुळपुळे यांनी निदर्शनात आणून दिले. ‘लोकमत’ने याआधी ‘बारवीच्या जलसमाधीतून वाचवण्यासाठी काळे वडखळच्या ग्रामस्थांचा टाहो!’ या मथळ्याखाली २५ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधलेहोते.त्यानंतरही गांभीर्याने न घेतलेल्या एमआयडीसी प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी धाव घेतली आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्रातील  कारखान्यांना पाणीपुरवठा करणाºया या बारवी धरणाच्या पाणलोटात ही तीन गावपाडे आहेत.>पुनर्वसनासाठी वर्षभर पाठपुरावाबारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या गावांच्या चहूबाजूने पाणी असताना ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहिले. या पावसाळ्यापूर्वी अन्यत्र पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी वर्षभर पाठपुरावा करून एमआयडीसीने केवळ आश्वासने दिली. मात्र, अद्याप पुनर्वसन केले नाही. या मनमानीविरोधात ग्रामस्थांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी आता दुसऱ्यांदा रखडल्यामुळे ग्रामस्थांचा जीव कासावीस झाला आहे.