शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
3
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
4
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
5
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
6
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
7
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
8
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
9
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
10
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
11
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
12
या ३ मारुती कारची बाजारात धूम, शोरूममध्ये पोहोचण्यापूर्वीच खरेदी करतायत लोक!
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
14
विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!
15
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
16
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया
17
AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत मिळवला 'मोठ्ठा' विजय; सुपर-८ चे तिकीट कन्फर्म
18
Monsoon: आभाळमाया बरसली, शेत-शिवारं भिजली, मान्सूनची जळगाव, अकोल्यापर्यंत धडक
19
AUS vs NAM : नवख्या संघाला ऑस्ट्रेलियानं स्वस्तात गुंडाळलं; कांगारूंचा दबदबा कायम, झाम्पाचा 'चौकार'
20
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही

प्रवासात मोबाइल चोरणाºया ‘टॉप २५’ची यादी अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:35 AM

शहर पोलिसांनी धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणा-यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘टॉप टष्ट्वेंटीफाइव्ह’चा अनोखा उपक्रम राबवला.

पंकज रोडेकरठाणे : शहर पोलिसांनी धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘टॉप टष्ट्वेंटीफाइव्ह’चा अनोखा उपक्रम राबवला. रेल्वे प्रवासात किंवा स्थानकात मोबाइलचोरीची ‘बुलेट ट्रेन’ ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसाट धावत असताना त्याला वेळीच ब्रेक लावण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी मोबाइल चोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावत केली आहे. यामुळे रेकॉर्डवरील चोरट्यांवर लक्ष राहीलच, त्याचबरोबर गुन्हे रोखण्यासाठी बºयापैकी फायदा होईल, असा विश्वास लोहमार्ग पोलिसांकडून वर्तवला जात आहे.ठाणे लोहमार्ग पोलिसांची सीमा कोपरी पुलापासून सुरू होते. ती दिवा आणि कोपर रेल्वेस्थानकांच्या मधोमध अशी आहे. तसेच दिवा रेल्वेस्थानकापासून पुढे कळंबोली आणि ठाणे ते ऐरोली अशी पसरली आहे. ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर लोकलसह एक्स्प्रेसद्वारे दररोज सहासात लाख प्रवासी प्रवास करतात. या वाढत्या प्रवासीसंख्येच्या तुलनेत लोहमार्ग पोलिसांचा फौजफाटा खूपच कमी आहे. त्यात रेल्वे प्रवासात मोबाइल चोरट्यांनी डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज ८ ते १० मोबाइलचोरीच्या घटनांची नोंद होत आहे. याआधी मोबाइलचोरीचे गुन्हे मिसिंगमध्ये नोंद केली जात होती.जून २०१७ पासून लोकलमध्ये चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३,००२ मोबाइल चोरीस गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत चार लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोबाइलच्या चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देत मोबाइल चोरट्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. किती जण कारागृहात आणि किती बाहेर आहेत, याची इत्थंभूत माहितीही पोलिसांकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे गुन्ह्याचा शोध लावणे सोपे झाले आहे.