शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

23,554 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीसाठी पोर्टलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 06:47 IST

कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली.

सुरेश लोखंडेठाणे : कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली. या कर्जमाफीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ पैकी शनिवारी २३ हजार ५५४ पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाने पोर्टलवर घोषित केली. त्यानुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या ६९ शाखांमध्ये कामास प्रारंभ झाला. अंगठा घेतल्यानंतर कर्जमाफीची १६८ कोटी ५९ लाख १४ हजारांची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.पोर्टलवर ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ८११ खातेदारांपैकी १२ हजार ७६६ (८१ टक्के) लाभार्थी शेतकरी घोषित झाले. जिल्ह्यातील सर्व शेतकरी ९४ कोटी ५७ लाख २९ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील १२ हजार ५६८ पैकी १० हजार ७९० (८६ टक्के) शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर आहेत. हा जिल्हा ७४ कोटी एक लाख ८४ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातील उर्वरित चार हजार ८१३ शेतकºयांच्या याद्यांचीदेखील लवकरच घोषणा होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय या कर्जमाफी शेतकºयांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्या लवकरच ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शेती विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत शेतकºयांच्या माहितीसाठी लावल्या जाणार आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने या शेतकºयांचा अंगठा घेतल्यानंतर त्यास त्वरित चारअंकी कोडनंबर मिळेल. तो लोड केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम त्वरित आॅनलाइन दिसेल. त्यावरील ‘एस’ आॅप्शन टच केल्यास रक्कम बँक खात्यात जमा होईल. ‘नो’ आॅप्शन क्लिक केल्यास शेतकºयास कर्जमाफी मान्य नसल्याचे उघड होईल आणि ती तक्रार थेट जिल्हा समन्वय समितीकडे (डीएलसी) नोंद होईल. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या समितीचे अध्यक्ष तर सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील आहेत. समिती तक्रारीची दखल त्याच दिवशी घेऊन ती निकाली काढत आहे.> शनिवारी १२ तक्रारींची नोंदशनिवारी दुपारपर्यंत १२ तक्रारींची नोंद झाली. यातील तीन तक्रारी निकाली काढल्या. उर्वरित सात तक्रारी डीएलसीकडे तर दोन तहसीलदारांच्या पातळीवर नोंद झाल्या आहेत. शिवाय, शेतकºयांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याची समस्यादेखील जिल्ह्यात आहे. या तक्रारी तहसीलदारांकडे तर कर्जमाफी मान्य नसल्यास डीएलसीकडे तक्रारींची नोंद होत आहे.