भुसारपाड्यात घरावर वीज कोसळली; रस्त्याअभावी जखमी महिलेला नेले झोळीतून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:05 IST2020-07-02T04:53:47+5:302020-07-02T07:05:46+5:30
चार किलोमीटरची पायपीट

भुसारपाड्यात घरावर वीज कोसळली; रस्त्याअभावी जखमी महिलेला नेले झोळीतून
जव्हार : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चांभारशेतपैकी भुसारपाडा येथे मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत सापटा यांच्या घरावर वीज पडून एक गाय ठार झाली, तर त्यांची पत्नी सुनीता या जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी सुनीता यांना उपचारासाठी जव्हार येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. रस्ता नसल्याने त्यांना चार किलोमीटरपर्यंत झोळीतून नेऊ न पुढे गाडीने गेले.
मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरणासह आणि विजेचा कडकडाट सुरू होता. सापटा यांच्या घरावरील कौल फोडून गोठ्यात बांधलेल्या गायीवर वीज पडली आणि गाय जागीच ठार झाली. यावेळी सुनीता घरातच परंतु लांब असल्यामुळे तिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. गाव चांभारशेतपासून चार किलोमीटर दूर आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने आणि सुनीता यांना चालता येत नव्हते. ग्रामस्थांनी तिला झोळीत टाकून चांभारशेतपर्यंत नेले.