शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे; भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:31 IST

भाजयुमोचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण म्हणाले की, ‘पवार यांंनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही.

कल्याण/डोंबिवली : अयोध्येत राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभरातून ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवलीतून गुरुवारी त्यांना हजारो पत्रे पाठवण्यात आली.

भाजयुमोचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण म्हणाले की, ‘पवार यांंनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, हे आम्हालाही माहीत आहे. येत्या ५ आॅगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होत आहे. या चांगल्या कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी होऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये. पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून त्यांच्या सिल्व्हर ओक या घरी कल्याणमधून किमान २० हजार पत्रे पाठविली जाणार आहेत.’

दरम्यान, डोंबिवलीतूनही पवार यांना हजारो पत्रे पाठवण्यात आली. डोंबिवलीतील मुख्य पोस्ट आॅफिस येथे युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकणकर यांनी ही पत्रे जमा केली.

ठाण्यातूनही पाठवलीत पत्रे

ठाणे : ठाण्यातील जेल तलावासमोरील मुख्य पोस्ट आॅफिसमधून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत ‘जय श्रीराम’ लिहिलेली हजारो पत्रे पवार यांना पाठविली आहेत. यावेळी भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश कोळी, भाजप आध्यात्मिक सेलचे संयोजक गजानन प्रधान, ठाणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस हृषीकेश मोरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रभरातून १० लाख पत्रे पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठविली जाणार असल्याचे निलेश कोळी यांनी सांगितले.

पवारांकडे पत्रे रवाना

भिवंडी : राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा भाजप युवा मोर्चाने निषेध केला आहे. भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष विशाल पाठारे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीतून श्रीराम लिहिलेली पाच हजार पत्रे पवार यांच्या निवासस्थानी पाठविण्यास सुरुवात केली आहे. राजू चौघुले, अ‍ॅड. संदीप जडेजा, मोहन कोंडा, अनिल केशरवानी, राकेश राणा, नरेश दायमा, नंदन गुप्ता, गणेश पोटीगारु, दिलीप साठे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा