शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
4
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
5
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
6
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
7
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
8
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
9
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
10
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
11
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
12
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
13
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
14
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
15
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
16
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

ठाणे जिल्ह्यातील ६५ महिला प्रशिक्षकांनी ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे घेतले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 3:39 PM

ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले.

ठळक मुद्दे६५ महिलांचे प्रशिक्षक पथक प्रथम तैनात करण्यात आले युवती, महिला यांच्यामध्ये ‘मासीक पाळी’ व्यवस्थापनाची गरजउपक्रमाला जिल्ह्यातील गावपाडे, खेडे यांच्यातील महिलां, युवती यांच्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी

ठाणे: जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील युवती, महिला यांच्यामध्ये ‘मासीक पाळी’ व्यवस्थापनाची गरज लक्षात घेऊन ठाणेजिल्हा परिषदेने त्यासाठी जनजागृती व प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील गावपाडे, खेडे यांच्यातील महिलां, युवती यांच्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी सुमारे ६५ महिलांचे प्रशिक्षक पथक प्रथम तैनात करण्यात आले. तत्पुर्वी या प्रशिक्षकांनी ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे धडे शनिवारी पार पडलेल्या कार्यशाळेत घेतले.ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रथम महिला शिक्षिका, थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.‘ स्त्री’ ही निसर्गाची किमया असून विश्वाची पुनर्निर्मिती करण्याची शक्ती तिच्यात सामावली आहे. यातील ‘मासिक पाळी’ हा पुनर्निर्मितीचा महत्वपूर्ण टप्पा तर आहेच, पण स्त्रीत्व आणि मातृत्व या दोघांचा समन्वय साधणाऱ्या या ‘मासिक पाळी’च्या नैसर्गिक वास्तवाचे व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे’, असे भावनिक व महत्वाचे मार्गदर्शन शिसोदे यांनी यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी महिला प्रशिक्षकांना केले.या कार्यशाळेला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षिका, अंगणवाडी केंद्रांच्या मुख्य सेविका, आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका आदी महिला प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी एक पूर्ण दिवसाच्या या प्रशिक्षण कालावधीत मासिक पाळी व्यवस्थापनाचे बारके व महत्व आदींचे मार्गदर्शन ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे राज्य समन्वयक डॉ. तारूलता धानके, यांनी केले. पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या प्रमिला सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन करून महिला प्रशिक्षकांना खेळते ठेवले.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद