ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा धुमधडाका आठवडाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 07:18 PM2019-03-30T19:18:57+5:302019-03-30T19:48:51+5:30

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवाराना त्यांचा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ठाणे मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. याप्रमाणेच भिवंडी मतदारसंघासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणि कल्याण मतदारसंघासाठी डोंबिवली येथील ह.भ.प.सावळाराम म्हात्रे क्रीडांगण येथील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना २ ते ९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्यासह कल्याण, भिवंडी मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Thane district's Lok Sabha constituency for the first time to fill the application form | ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा धुमधडाका आठवडाभर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या माहितीसह निवडणुकीशी संबंधीत आतापर्यंतची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली

Next
ठळक मुद्दे१२ एप्रिलरोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची संधी ही देण्यात आली २९ एप्रिलला मतदान होऊन २३ मेला मतमोजणीठाण्यात राज्यात सर्वाधिक सखी मतदान केंद्र जिल्ह्यात -निवडणूक कार्यलय परिसरात मनाई आदेश -

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवार २ एप्रिलपासून प्रारंभ होईल.अर्ज दाखल करण्याचा ९ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. यानंतर तिन्ही मतदार संघासाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी १० एप्रिल रोजी असून १२ एप्रिलरोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची संधी ही देण्यात आली आहे. यानंतर २९ एप्रिलला मतदान होऊन २३ मेला मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे फडघम वाजू लागले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्यात होऊ घातली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या माहितीसह निवडणुकीशी संबंधीत आतापर्यंतची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे किशन जावळे, कल्याणचे शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त घुले,अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील आदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांची मतदान केंद्रांमध्ये गैरसोईचा सामना करावा लागू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध स्वरूपाच्या विशेष सोईसुविधा उपलब्ध दिल्या जात जाणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवाराना त्यांचा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ठाणे मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. याप्रमाणेच भिवंडी मतदारसंघासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणि कल्याण मतदारसंघासाठी डोंबिवली येथील ह.भ.प.सावळाराम म्हात्रे क्रीडांगण येथील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना २ ते ९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्यासह कल्याण, भिवंडी मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी निश्चित केलेले सुमारे सहा हजार ४८८ मतदान केंद्रांपैकी काही ठिकाणी ‘सखी’ मतदान केंद्रे देखील निश्चित केली जाणार आहे. या ‘सखी’ केंद्रांवर संपूर्ण महिला अधिकारी, कर्मचारी वर्ग मतदाराना सेवा देणार आहेत. याप्रमाणेच दिव्यांग मतदान केंद्रही देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत नव्याने झालेल्या मतदार नोंदणीमुळे सुमारे २२७ सहाय्यक मतदान केंद्र जिल्ह्यात वाढले आहेत. त्यांची मंजुरी घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा, ेलेकुरवाळ्या मतदारांसाठी पाळणाघर उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्रांवर महिला, पुरूषांच्या वेगळ्या रांगांचे नियोजन आहे. याप्रमाणेच दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी एक विशेष रांग मतदान केंद्रांवर राहणार आहे. यासह जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा निवडणुकीची तयार पूर्ण झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस प्रशासन, आयकर विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
.................
* ठाण्यात राज्यात सर्वाधिक सखी मतदान केंद्र जिल्ह्यात -
निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदार संघामध्ये किमान एक महिलांच्या नियंत्रणामध्ये मतदान केंद्र उभारण्याच्या सुचना आल्या आहेत. यानुसार नियोजन केले असता राज्यात सर्वाधिक महिलांच्या नियंत्रणातील सखी मतदान केंद्र्र ठाणे जिल्ह्यात असणार आहे. त्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवला असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. मतदान केंद्रांमध्ये लेकूरवाळ्या मतदार महिला आल्यास पाळणाघराप्रमाणे कक्ष उभारण्यात येणार आहे. तिथे मुलांना ठेवून महिला मतदानाचा हक्क बजावू शकतील. ग्रामीण भागामध्ये आशा कर्मचारी तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने ही केंद्र उभारली जातील. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये वैद्यकीय मदत पथक तैनात ठेवण्याचे नियोजन केले आहे.
.................
मतदान यंत्रे आणि अधिकारी - कर्मचारी -
जिल्ह्यात आवश्यक असलेल्या मतदान यंत्रे पुरेशी असून नियोजनापेक्षा २० टक्के जास्त मशिन्स ही उपलब्ध झाले आहेत. तर मतदार केंद्रांमध्ये अपेक्षीत मनुष्यबळ देखील उपलब्ध झाले आहे. आता राखीव मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. निवडणूक कामासाठी ४७ हजार मनुष्यबळ लागणार आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे ६२ हजार कर्मचा-यांचे मनुष्यबळ कामासाठी उपलब्ध झाले आहे. परंतु सुमारे पाच हजार ४०० कर्मचा-यांनी निवडणूक कामासाठी नकार दिल्यामुळे त्यांच्यासाठी नोटीस काढण्यात आल्या आहेत. परंतु तसे आवश्यक अधिकारी - कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे जादा कामाचा कोणताही ताण अधिकारी- कर्मचारी यंत्रणेवर पडणार नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
...................
जिल्ह्यातील ३५ अवैध शस्त्रास्त्र जप्त -
आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी केलेला आहे. जिल्ह्यातील सुमारे सहा हजार परवानाधारक शस्त्रास्त्रांपैकी आतापर्यंत सुमारे साडे तीन हजार पेक्षा जास्त शस्त्रे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शस्त्र लवकरच जमा केले जातील. या कालावधीत आतापर्यंत जिल्ह्याभरातूनसुमारे ३५ अवैध शस्त्रे पोलिसांनी जप्त केले, याशिवाय ठाणे पोलिस आयुक्तालयात आचारसंहितेचे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
ााचे नार्वेकर यांनी सांगितले.
...........
८४ हजार लिटर दारूसह २५ किलो ड्रग्ज जप्त-
जिल्ह्याभरातून पोलिसांनी आतापर्यंत ८४ हजार लिटर अवैध दारू साठा जप्त केला आहे. याशिवाय २५ किलोड्रग्ज देखील हस्तगत केले आहे. खाजगी व सरकारी मालमत्तेच्या विद्रुपीकरणाविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंद झाले आहेत.
............
निरीक्षकांची नियुक्ती -
या निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले जाणार आहे. या प्रत्येकावर दोन मतदारसंघाची जबाबदारी दिले जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघ निहाय तैनात राहणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी पुरवावयाच्या सुविधाबाबत कोकण विभागीय आयुक्त निरीक्षक म्हणून काळजी घेणार आहे.
..........
निवडणूक कार्यलय परिसरात मनाई आदेश -
जिल्ह्यात २ एप्रिलपासून इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या चहुबाजूने १०० मीटर परिसरात कलम १४४ ( २) अन्वये पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी यांना उमेदवारी अर्ज दाखल करतांना सभा, बैठक, पत्रकार परिषद आदींसाठी प्रतिबंद करण्यात आला आहे. उमेदवारी दाखल करतांना उमेदवार व त्यांचे समवेत चार व्यक्तिंनाच निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कक्षात जाता येईल. या कार्यालय परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाइचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Thane district's Lok Sabha constituency for the first time to fill the application form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे