ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ, कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्याचा शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 09:51 IST2019-02-20T09:50:20+5:302019-02-20T09:51:01+5:30
ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ, कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्याचा शिरकाव
ठाणे - ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मध्यरात्री नितीन कंपनी भागातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरला होता. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन केंद्र, वनविभाग, पोलीस अधिकारी उपस्थित असून पाहणी काम सुरू आहे.
कोरम मॉलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून पहाटे 05:29च्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत संपूर्ण मॉलची व परिसराची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. कोरम मॉल सर्च ऑपरेशन संपले. तरीही खबरदारी उपाय म्हणून सध्या कोरम मॉल बंद ठेवण्यात आला आहे. बिबट्याचा शोध घेतला जात असून, कोरम मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.