Leonid meteor showers on Monday morning | सोमवारी पहाटे लिओनिड उल्कावर्षाव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी

सोमवारी पहाटे लिओनिड उल्कावर्षाव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी

ठाणे : रविवार, १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सिंह राशीतील मघा नक्षत्रात लिओनिड उल्कावर्षाव पाहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उल्कावर्षावाचे निरीक्षण करणे, ही खगोलप्रेमींसाठी पर्वणी असते. १७ नोव्हेंबर रोजी रात्री (सोमवारी पहाटे) ३च्या सुमारास ईशान्य (नॉर्थ-ईस्ट) क्षितिजावर मघा नक्षत्रातून उल्कावर्षाव होताना दिसेल. यावर्षी आकाशात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार आहे. तरीही, तासाला १०-१५ उल्का पडताना दिसतील, असा अंदाज आहे. शहराबाहेर जाऊन निरीक्षण केल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो. पृथ्वी या दिवशी ५५ पी टेम्पल टटल या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. दर ३३ वर्षांनी हा धूमकेतू पृथ्वीपाशी येत असतो. त्यामुळे दर ३३ वर्षांनी या दिवशी मोठा उल्कावर्षाव पाहायला मिळतो. १७ नोव्हेंबर २००० रोजी अर्नाळायेथून उल्कावर्षावाचे निरीक्षण करताना तासाला ४०० उल्का पडताना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. तसा मोठा उल्कावर्षाव रविवारी पाहायला मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Leonid meteor showers on Monday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.