शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

... अन्यथा पदे सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:19 IST

प्रताप सरनाईक यांनी ठणकावले : बैठकीला ‘त्या’ नाराजांची गैरहजेरी

मीरा रोड : ठाणे, मुंबईतील शिवसैनिकांप्रमाणे मीरा- भार्इंदरमध्ये आक्रमक व्हा, असे सांगतानाच संघटनेपेक्षा मोठे कुणी नाही. कामे करायची नसतील तर पदे सोडा, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत नाराजांना ठणकावत इशारा दिला. नवीन पदनियुक्त्यांवरून वादाची प्रचीती बैठकीत त्या नाराजांच्या अनुपस्थितीवरून आली.

मीरा-भार्इंदर शिवसेनेची प्रमुख पदे जाहीर करताना अनेक वर्षे शहरप्रमुख असलेले धनेश धर्माजी पाटील यांना ओबीसी आघाडीच्या मीरा-भार्इंदर संघटकपदी नियुक्ती करून त्यांच्या जागी लक्ष्मण जंगम यांना नेमले आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग १४ मध्ये सेनेच्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा ठपका असलेले उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांच्या गोटातले पाटील मानले जातात. निवडणुकीत पराभूत झालेले प्रभाकर म्हात्रे यांना जिल्हाप्रमुख, तर संदीप पाटील यांना पश्चिमेचे उपजिल्हाप्रमुखपद देताना ते इतकी वर्षे ज्या पदांवर होते, त्या कार्याचा आढावा घेतला नाही.स्नेहल सावंत यांना जिल्हा संघटक, तर नव्याने आलेल्या नीशा नार्वेकर यांना थेट भार्इंदर पूर्व उपजिल्हा संघटक केल्याने नीलम ढवण, तारा घरत, कांचन लाड, हेमलता जोशी आदी सक्रिय व जुन्या शिवसैनिकांना डावलल्याची नाराजी महिलांमध्ये आहे. मीरा रोडच्या दीप्ती भट यांना भार्इंदर पश्चिमेस, तर पश्चिमेच्या शुभांगी कोटियन यांना उत्तन विभाग उपजिल्हा संघटक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपातून आलेले शैलेश पांडे यांची पत्नी स्रेहा सेनेच्या नगरसेविका आहेत. पण, पांडे यांना उत्तर भारतीय विभागाचे प्रवक्तेपद देताना त्यांच्या सोबतच्यांना डावलले, तर नव्याने आलेले विक्रमप्रताप सिंग यांना थेट भार्इंदर पूर्वेचे उपजिल्हाप्रमुख केल्याने पांडे व सहकारी संतप्त झाले आहेत. सरनाईक यांच्या कार्यालयातील बैठकीस शंकर वीरकर, धनेश पाटील, नीलम ढवण, शैलेश पांडे आदी नाराज त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित नव्हते.

निवडणुकीत काहींनी काम केले नाही. नंतर, कामे करतील, अशी आशा होती. काहींना वाटले की, स्वत:च्या भागात दुसरे कुणी मोठे नाही. पण, लक्षात ठेवा संघटनेपेक्षा कुणी मोठे नाही. केवळ कार्ड छापण्यासाठी शिवसेनेचा वापर करू नका. ज्यांना काम करायचे नसेल, त्यांनी पदे सोडून बाजूला व्हा. संघटनेत काही कटू निर्णय घ्यावे लागतात. पण, अजूनही पदांची यादी जाहीर होणे बाकी आहे, असे सांगत नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न सरनाईकांनी केला.यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक स्नेहल सावंत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष अरुण कदम व संजय नलावडे, विरोधी पक्षनेते राजू भोईर, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, विक्रमप्रताप सिंग, उपजिल्हासंघटक दीप्ती भट, सुप्रिया घोसाळकर, शुभांगी कोटीयन, नीशा नार्वेकर यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.मुंबई, ठाण्यासारखे आक्रमक व्हामुंबई - ठाण्यातील शिवसैनिकांसारखे आक्रमक व्हा, सक्रिय व्हा, सत्ताधाऱ्यांना जाब विचारा. भाजपाचे स्थानिक नेतृत्व महापालिका म्हणजे स्वत:ची खाजगी मालमत्ता समजत आहे. पालिकेचे बेकायदा कार्यक्रम यापुढे उधळून लावा. लोकसभा व विधानसभाच नव्हे, तर येणारी पालिका पण जिंकायची आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका