शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:51 IST

ठाणे, भिवंडी, कल्याण अवैध मतांचे प्रमाण

- प्रशांत माने कल्याण : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांतील सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते अवैध ठरल्याने वाया गेली आहेत. पूर्वीच्या ठाणे लोकसभेचे २००९ मध्ये विभाजन होऊन ठाणे आणि कल्याण मतदारसंघांची निर्मिती झाली. १९९९ मध्ये झालेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २८ हजार ३४४ मते बाद ठरवण्यात आली होती. तर, २००९ च्या निवडणुकीत अवघी सहा मते अवैध ठरली होती.मतदानाच्या दिवशी एकही मतदार मागे राहू नये, यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी मतदानयंत्रे नव्हती. त्यामुळे मतपत्रिकांवर शिक्के मारून मतदान केले जात होते. त्यामुळे त्यावेळी अवैध मतांचे प्रमाण अधिक असायचे. आता ईव्हीएम मशीनमुळे अवैध मतांचा प्रश्नच बाद झालेला आहे. पण, तांत्रिक घोळामुळे काही मते नोंद न होण्याचे प्रमाण काही निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचारी, पोलीस तसेच सैन्य दलातील जवानांकडून होणाऱ्या पोस्टल मतदानात मते बाद होण्याचे प्रमाण आढळून आले आहे.एकूण मिळालेल्या मतांच्या तुलनेत बाद मतांचे प्रमाण ३.०३ टक्केठाणे मतदारसंघात १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रकाश परांजपे यांना तीन लाख ९१ हजार ४४६ मते मिळाली होती. त्यावेळी मतपत्रिकांचा वापर झाला होता. त्या निवडणुकीत २८ हजार ३४४ मते बाद झाली होती. या अवैध मतांची आकडेवारी एकूण मतांच्या ३.०३ टक्के इतकी होती. त्याआधीच्या १९९८ आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांतही अनुक्रमे ११ हजार ४७४ आणि नऊ हजार ८१२ मते अवैध ठरली होती. हे प्रमाण एकूण मिळालेल्या मतांच्या तुलनेत १.२१ आणि १.०७ टक्के इतके होते.एकेका मताची लढाईपूर्वी मतपत्रिकांमुळे बाद मतांचे प्रमाण जास्त असायचे. चुकीच्या पद्धतीने शिक्के मारणे, एकाच मतपत्रिकेवर सर्वच उमेदवारांच्या चिन्हांवर शिक्के मारून ठेवणे, मतपत्रिकांवर उमेदवारांना उद्देशून पेनने संदेश लिहिणे, ही मतपत्रिका बाद होण्यामागची कारणे होती. मतपत्रिकांच्या मोजणीसाठी लागणारा वेळ आणि बाद होणाºया मतांचे प्रमाण पाहता त्यावेळी एकेक मत मोलाचे ठरायचे.चार ते पाच आकड्यांत संख्या१९९९ पर्यंत मतपत्रिकांचा वापर केला जात होता. त्यावेळी बाद मतांचे प्रमाण सर्वाधिक असायचे. ठाणे लोकसभा मतदारसंघात झालेल्या १९९६ ते १९९९ पर्यंतच्या निवडणुकांचा आढावा घेता १९९८ आणि १९९९ ला मते बाद होण्याचे प्रमाण पाच आकड्यांत होते. तर, १९९६ मध्ये हे प्रमाण चार आकड्यांत दिसून आले.गेल्या सहा निवडणुकांमधील आढावा घेता ठाणे लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये सहा मते बाद ठरली होती. ही आतापर्यंतची सर्वात कमी बाद मते आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेbhiwandi-pcभिवंडीkalyan-pcकल्याण