अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST2019-05-17T00:38:11+5:302019-05-17T00:38:21+5:30
उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे.

अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी
ठाणे : उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे. तर, २३ एप्रिल ते १४ मे दरम्यान पाच जण दगावल्याची माहिती पुढे आल्याने जानेवारी ते १४ मे या सव्वाचार महिन्यांत ११ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. गतवर्षात या काळात एकाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू सोडा, पण एकही बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ मे २०१९ या कालावधीत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या रु ग्णांचा आकडा १६७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या एकूण १० वॉर्डांमध्ये याचदरम्यान ४१ हजार १४७ जणांची तपासणी केली. यामध्ये २८ हजार ३७९ नवी मुंबईकरांनी तपासणी करून आघाडी घेतली आहे. मात्र, एकही जण दगावला नसून अवघे १६ रुग्ण बाधित असल्याचे पुढे आले. त्यातील दोन उपचारार्थ दाखल असून १३ जणांना घरी सोडण्यात आले. यापाठोपाठ ठाणे जिल्हा रु ग्णालयात चार हजार ६५० जणांनी तपासणी केली. उल्हासनगर येथे तीन हजार ५४७, ठामपा दोन हजार ४५४, मीरा-भार्इंदर एक हजार ५२०, भिवंडीत ३४५ आणि सर्वात कमी केडीएमसी येथे २४३ जणांनी तपासणी केली आहे.
उल्हासनगरसह भिवंडीत
एकही रुग्ण नाही
जिल्ह्यातील एकूण ४१ हजार १४७ जणांच्या तपासणीत १७७ संशयित रु ग्ण म्हणून पुढे आल्यावर त्यापैकी १६७ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले.
यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधित ८६, त्यानंतर मीरा-भार्इंदर ३७, कल्याण २६ आणि नवी मुंबई १६ तसेच जिल्हा रु ग्णालयात दोन रु ग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिका हद्दीत अद्याप एकही रु ग्ण आढळून आला नाही.
आतापर्यंत १३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. यामध्ये ठामपाच्या हद्दीतील ८१, मीरा-भार्इंदर ३३, नवी मुंबई १३, कल्याण सात रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.