शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

लेझर शो, फ्लोटिंग मार्केट हे तर फालतू प्रकल्प- महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:43 IST

शाई धरण होणार अथवा नाही, हे आजही गुलदस्त्यात असले, तरीसुद्धा मुंब्य्रातील डोंगरावर लेझर शो, फ्लोटिंग मार्केटसह इतर फालतू प्रकल्पांवर निधी खर्च करण्यापेक्षा शाई धरण कसे उभारता येऊ शकते, यासाठी निधीची तरतूद करावी, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बुधवारी महासभेत दिले.

ठाणे : पाण्याच्या समस्येवरून मागील दोन दिवस सुरू असलेल्या लक्षवेधीला अखेर विराम मिळाला आहे. शाई धरण होणार अथवा नाही, हे आजही गुलदस्त्यात असले, तरीसुद्धा मुंब्य्रातील डोंगरावर लेझर शो, फ्लोटिंग मार्केटसह इतर फालतू प्रकल्पांवर निधी खर्च करण्यापेक्षा शाई धरण कसे उभारता येऊ शकते, यासाठी निधीची तरतूद करावी, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बुधवारी महासभेत दिले. असे वक्तव्य करून एक प्रकारे प्रशासन आणि राष्टÑवादीलासुद्धा अप्रत्यक्षरीत्या टार्गेट केले असले, तरी यापूर्वी मंजूर झालेले प्रकल्प फालतू होते का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.मागील दोन दिवसांपासून पाण्याच्या लक्षवेधीवर महासभेत चर्चा सुरू होती. ठाणे महापालिकेने इतर महत्त्वाचे प्रकल्प बाजूला ठेवून आधी शाई धरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्टÑवादीने लावून धरली. पाण्याच्या या समस्येवरून बुधवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली भूमिका विशद केली. राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहराला पुरेसे पाणी मिळत असल्याने शाई धरणाचा विचार करण्यापेक्षा आधी साठवण क्षमता वाढवण्यावर, पाणीगळती, चोरी आणि नियोजनावर अधिक भर द्यावा, अशी मागणी केली. पाणीपुरवठा विभागाकडून उत्पन्न आणि खर्चाच्या बाबतीत ताळमेळच बसत नसून उत्पन्न १५० कोटी आणि पाणीखरेदीसाठी १७० कोटींचा खर्च पालिका करत असल्याचा मुद्दा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी मांडला.दुसरीकडे राष्टÑवादीच्या टीकेचा समाचार घेताना आपल्याला रात्री कसे स्वप्न पडले, याचा उल्लेख करून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी राष्टÑवादीने केलेल्या आरोपांची हवाच गुल केली. स्वप्नात कळव्यात कशा पद्धतीने झोपडपट्टी वाढत आहे, त्यांना रंगरंगोटी केली जात आहे, पाणी कितीही वापरा शाई धरण मंजूर झाले आहे. मुंब्य्रात आणि दिव्यातही अशा स्वरूपाचे बॅनर लागल्याचे सांगून शाई धरण पुढील २० वर्षांनंतर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात धरणाचा खर्च आजघडीला १५०० कोटी असून पाइपलाइन संप, पंप, ट्रीटमेंट प्लान्ट, कामगार, त्यांचे पगार असा मिळून सुमारे तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. त्यातही विस्थापितांचा खर्च हा आणखी वाढणार आहे.त्यामुळे हा खर्च पालिकेला झेपणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धरण व्हावे, ही सर्वांची इच्छा असली, तरी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून या धरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तूर्तास ठाणे शहरात मुबलक पाणी असून बारवी धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी मिळू शकणार आहे.केवळ तेथील २३९ विस्थापितांचा प्रश्न शिल्लक आहे. तसेच भातसामधूनही १०० दशलक्ष पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, स्टेमसुद्धा ५० दशलक्ष पाणी देण्यास तयार आहे. त्यामुळे या सर्वांचा आता विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर, प्रशासनानेसुद्धा भातसा आणि बारवी धरणातून २०० एमएलडी पाणी महापालिकेने मिळू शकणार असल्याचे स्पष्ट केले.महापौरांनी आमदार जितेंद्र आव्हाडांना केले टार्गेटयेत्या काही दिवसांत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाणार असून शाई धरणासाठी शासनाकडे सर्वपक्षीयांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले. परंतु, धरण करायचे असेल, तर डोंगरावरील लेझर शो, फ्लोटिंग मार्केट आदींसह इतर फालतूु प्रकल्पांवर खर्च करण्यापेक्षा धरणासाठी बजेटमध्ये दरवर्षी तरतूद करावी, असे आदेशही त्यांनी दिले.या वक्तव्यातून त्यांनी प्रशासन आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच एक प्रकारे टार्गेट केल्याचे दिसून आले. त्यांच्याच मतदारसंघात महापौरांनी उल्लेख केलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आले आहेत. त्यातही पाण्याची समस्या मार्गी लागावी आणि धरण व्हावे, या मागणीसाठी बुधवारी सकाळी आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापौरांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती.असे असतानासुद्धा महापौरांनी महासभेत त्यांच्याच प्रकल्पांवर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय, धरणासाठी एमएमआरडीएकडून काही कर्ज घेता येऊ शकते का? शासनाकडून काही मदत मिळवता येऊ शकते का? यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.कथोरे,हिंदुराव यांचा धरणाला विरोधशाई धरणाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला नव्हता. त्यावेळेस धरण होऊ नये म्हणून राष्टÑवादीत असलेले तेव्हाचे आमदार किसन कथोरे आणि प्रमोद हिंदुराव यांनीच त्या धरणाला विरोध केल्याचा पलटवारही त्यांनी केला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे