शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कोपरी नाक्यावर मोठी कोंडी; वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 00:31 IST

नाकाबंदीमुळे पेणकरपाडा, एमआयडीसी व काशिमीरा नाका येथून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीने जॅम झाले होते.

ठाणे : नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाईचा बडगा उगारला. कोपरी चेकनाक्यावर नवघर पोलिसांनी सकाळपासूनच सुरु केलेल्या कारवाईमुळे तब्बल दोन, अडिच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवर डबलसिट प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये केवळ तीन लोकांनाच प्रवास करण्याची अनुमती आहे. मात्र अडिच महिन्यांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडलेले नागरिक आता बाहेर सर्वकाही आलबेल असल्यासारखेच वागत आहेत. अशा वाहनधारकांवर सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांचे फोटो घेऊन, वाहतूक पोलीस त्यांचा तपशील नोंदवून घेत होते. या सर्वांवर रितसर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे काही वाहनधारक पोलिसांशी वाद घालत होते. त्यामुळे अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांच्या कारवाईमुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन, रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. याशिवाय, सर्व नियमांचे पालन करून खरोखर महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांचाही यामुळे खोळंबा झाला. मात्र सर्व कागदपत्रे असलेल्या नागरिकांना, रुग्णांना, गरोदर महिला तसेच अन्य गरजुंना पोलिसांनी लगेचच जाऊ दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरुच होती. नवघर पोलिसांच्या कारवाईमुळे ठाणे पोलिसांनाही दुपारी जाग आली. त्यानंतर कोपरी पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत कारवाईला सुरुवात केली.दहिसर ते वरसावे नाका ‘जॅम’मीरा रोड : मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी सकाळपासून दहिसर चेकनाका येथे मुंबईत प्रवेश करणाºया वाहनांबाबत काटेकोर तपासणीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे चेकनाका ते वरसावे नाक्यापर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागून वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या पाहून कोरोनाची भीती किंवा लॉकडाऊ न नक्की आहे का, असा प्रश्न पडला.

शासनाने काही बंधने आणि अटीशर्ती ठेवून १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये दुचाकीवर एकच, तर चारचाकी वाहनात तीन जणांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरण्यास मनाई कायम आहे. मात्र, १ जूनपासून मुंबईत जाणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून नियमांचेही सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे या बेशिस्त आणि बेजबाबदार लोकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा कंबर कसली असून मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथे सोमवारी सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. परवानगीपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.नाकाबंदीमुळे पेणकरपाडा, एमआयडीसी व काशिमीरा नाका येथून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीने जॅम झाले होते. तपासणीनंतरच वाहन पुढे सरकत असल्यामुळे काही तास लोक अडकून पडले होते. सोशल मीडियावरही दहिसर नाका जॅम झाला असून पोलीस कारवाई करत असल्याने तिकडे जाऊ नका, असे संदेश फिरत होते. पोलीस तपासणीच्या धास्तीने अनेक वाहनचालकांनी पळ काढला. 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस